
कर्करोग उपचारांसाठी 'एआय' तंत्रज्ञानावर दिला जाणार भर! एनसीजी-इंडिया एआय 'कॅच' अनुदान, एआयची अमलबजावणी गरजेची
कर्करोग उपचार व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर करण्यावर ‘इंडिया एआय समिट २०२६’मध्ये भर देण्यात आला. नॅशनल कैसर ग्रीड (एनसीजी) आणि इंडिया एआय मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत मंडपम, नवी दिल्ली येथे ‘फ्रॉम इनोव्हेशन टू इम्पॅक्ट : स्केलिंग ट्रेस्टेड एआय फॉर कैंसर केअर’ या विषयावर उच्चस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात कर्करोग तपासणी, निदान, उपचार निर्णय सहाय्य, रुग्ण सहभाग आणि उपचार समन्वय अशा विविध टप्प्यांवर एआय उपाययोजना प्रत्यक्ष रुणालयीन व्यवस्थेत कशा राबविता येतील, यावर शासन, संशोधन संस्था, वैद्यकीय क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र आणि परोपकारी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विजय नेहरा आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी सार्वजनिक डिजिटल आरोग्य “यायाभूत सुविधा मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. नवोन्मेषी एआय उपाययोजना प्रत्यक्ष आरोग्य यंत्रणेत कार्यक्षमतेने अंमलात येणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.(फोटो सौजन्य – istock)
नॅशनल कॅन्सर ग्रिडचे संयोजक डॉ. प्रमेश यांनी डिजिटल साधने आणि एआय पुढील काही वर्षांत आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला, डेटा-आधारित, सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाची कर्करोग सेवा देण्यासाठी एनसीजी व इंडिया एआयची भागीदारी महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी नमूद केले. देशभरातील कर्करोग उपचार व्यवस्थेत एआय उपाययोजनांची चाचणी, अमलबजावणी आणि विस्तार गतिमान करण्याचा त्यामागील उद्देश आहे. कर्करोग उपचार अधिक परिणामकारक, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कॅच अनुदानासाठी निवड झालेल्या संस्थांमध्ये नामांकित तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असून त्यांनी देशातील विविध कर्करोग रुग्णालयांबरोबर भागीदारी केली आहे. यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल, क्रिस्चियन मेडिकल कॉलेज, राजीव गांधी कैंसर इन्स्टट्यूट अँड रिसर्च सेंटर होमी भाभा कैसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आदी संस्थांचा समावेश आहे. प्रत्येक विजेत्या संस्थेला प्रत्यक्ष क्लिनिकल वातावरणात त्यांच्या उपाययोजनांची अमलबजावणी व पडताळणी करण्यासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.
हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल
यावेळी इंडिया एआय-एनसीजी कैंसर एआय अॅड टेक्नॉलॉजी चॅलेंज (सीएटीएचः कॅच)’ अनुदान विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कर्करोग क्षेत्रात प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज असलेल्या २८ एआय उपाययोजनांचा समावेश असलेला ‘केंच कपीडियम’ ही प्रकाशित करण्यात आला. या उपाययोजनांमध्ये तपासणीपासून ते उपचार व्यवस्थापनापर्यंतच्या विविध टप्प्यांवर तंत्रज्ञानाचा वापर कसा होऊ शकतो, याची उदाहरणे मांडण्यात आली आहेत. डॉ. राजीव बहल यांनी एआय उपाययोजनांसाठी कठोर शास्त्रीय पडताळणी, पुराव्याधारित मूल्यमापन आणि जबाबदार अमलबजावणी चौकटीची गरज व्यक्त केली. योग्य प्रमाणीकरण आणि आरोग्य व्यवस्थेशी सुसंगत एकात्मता यांवरच एआयचा प्रभाव अवलंबून राहील, असे त्यांनी सागितले.