या लोकांना नाही मिळणार रेशनचं धान्य! तुमचंही नाव यादीत असेल तर आत्ताच पूर्ण करा e-KYC; ही आहे सोपी पद्धत
रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा नियम जारी केला आहे. या नियमांतर्गत रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर हे काम झाले नाही तर रेशनधारकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. पण अनेकांना ही प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करावी याची कल्पना नाही. जर तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून e-KYC पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे कामं करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)