Tech Tips: अरे देवा! WIFI चा स्पीड पुन्हा स्लो झाला? चिंता करू नका, काही सोप्या टीप्स सोडवतील तुमची समस्या
वायफाय म्हणजे सध्याच्या काळाची गरज बनली आहे. घर असो किंवा ऑफीस, जोपर्यंत फोनला वायफाय कनेक्ट करत नाही. आपल्या मनाला शांत वाटत नाही. सध्या नेटवर्कच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत. की लोकं महागडा रिचार्ज करण्यापेक्षा वायफाय खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. एका वायफाय नेटवर्कवर तुम्ही अनेक डिव्हाईस कनेक्ट करू शकता, त्यामुळे पैशांची देखील बचत होते.
याशिवाय वायफायचा स्पीड इतका असतो की तुम्ही अगदी सहज कितीही मोठा व्हिडीओ किंवा एखादी मोठी फाईल चुटकीसरशी डाऊनलोड करू शकता. सध्याच्या बदलत्या काळात लॅपटॉपची मागणी देखील प्रचंड वढली आहे. ऑनलाइन अभ्यास असो, घरून ऑफिसचे काम असो किंवा चित्रपट पाहणे असो किंवा गेम खेळणे असो, या सर्व कामांसाठी वाय-फायचा वापर केला जातो. असा हा प्रचंड फायद्याचा असणारा वायफाय कधी कधी आपली डोकेदुखी देखील ठरू शकतो. जेव्हा वायफायचं नेटवर्क कमी होते की किंवा स्पीड स्लो होते, तेव्हा आपल्या अनेक कामात अडचणी निर्माण होतात. तुमच्या घरातील वायफाय सुद्धा योग्य प्रकारे काम करत नसेल तर तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा लोकं राऊटर भिंतीच्यामागे किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवतात. यामुळे डिव्हाईसमध्ये सिग्नल येण्यास अडचण निर्माण होते, आणि वायफायची स्पीड स्लो होते. राऊटर भिंतीच्यामागे किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवण्यापेक्षा मोकळ्या जागी ठेवा. ज्यामुळे गॅझेटला नेटवर्क मिळेल आणि वायफायची स्पीड देखील फास्ट होईल.
ब्लूटूथ स्पीकर आणि अन्य वायरलेस गॅजेटमधून निघणाऱ्या लहरी अनेकदा वाय-फायच्या नेटवर्कवर परिणाम करतात, ज्यामुळे स्पीड स्लो होतो. तुमचा राउटर अशा उपकरणांपासून दूर ठेवा. यामुळे वाय-फाय चांगले काम करेल.
एकाच वेळी एकापेक्षा जास्त डिव्हाईस कनेक्ट केल्यास वायफायची स्पीड स्लो होते. अशावेळी वायफायची स्पीड वाढवण्यासाठी इतर डिव्हाईस डिस्कनेक्ट करा, ज्यांचा वापर केला जात नाही. असे केल्याने प्राइमरी डिव्हाईसला संपूर्ण नेटवर्क मिळेल आणि वेग देखील सुधारेल.
जर तुमचा राऊटर ३ ते ४ वर्षे जुना असेल तर तो अपग्रेड करा, कारण यामुळे देखील वायफाय स्पीडवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, तुम्ही घरी ड्युअल-बँड किंवा ट्रिपल बँड राउटर बसऊ शकता, जो वाय-फाय 6 आणि 6E ला सपोर्ट करतो. यामुळे वाय-फाय कनेक्टिव्हिटी टिकेल आणि तुम्हाला चांगला स्पीडही मिळेल.
Friendship Day 2025: तुमच्या मित्रांना द्या खास सरप्राईज, यंदा चॉकलेट नाही तर हे Gadgets करा गिफ्ट
तुमच्या वाय-फायचे फर्मवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा. यामुळे केवळ वाय-फायचा वेगच नाही तर सुरक्षा स्तरही सुधारेल. यामुळे तुम्ही हाय-स्पीड इंटरनेट वापरण्यास सक्षम व्हाल आणि तुमची गोपनीयता देखील राखली जाईल.
WIFI चा फुल फॉर्म काय आहे?
Wireless Fidelity
घरासाठी कोणता राऊटर फायद्याचा?
ड्युअल-बँड किंवा ट्रिपल बँड राउटर
WIFI घरी कोणत्या ठिकाणी ठेवावा?
मोकळ्या जागी जिथे गॅझेटला नेटवर्क मिळेल