WhatsApp Tips: अॅपमधील चॅट्सच्या बोरिंग थीमने तुम्हीही कंटाळलात? असा द्या नवा लूक, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
लोकप्रिय मेसेज व्हाट्सअॅपचे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. या युजरसाठी कंपनी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. असे अपडेट्स ज्यामुळे युजरचा ॲप वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलतो. कंपनीने आतापर्यंत त्यांच्या यूजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स रोलआउट केले आहे, ज्यामध्ये स्टेटसला म्युझिक अॅड करणं, इतर युजर्सना मेन्शन करणं, व्हाट्सअॅप ग्रुपसाठी पोल. अशा अनेक फीचर्समुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे.
कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या युजरसाठी एक नवीन अपडेट घेऊन आली आहे. हे अपडेट व्हाट्सअॅप चॅटसाठी आहे. अलीकडेच कंपनीने Voice Chat नावाचे एक फीचर लाँच केले होते. ज्यामुळे ग्रुप चॅटींगची मजा आणखी वाढली. Voice Chat नंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवीन फीचर घेऊन आली आहे. हे फीचर चॅट थीमसाठी आहे. चॅट्सला नवीन लूक देण्यासाठी कंपनीने Chat Theme नावाचे फीचर लाँच केले होते. मात्र या फीचरबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांचे बोरिंग चॅट्स थीम बदलून एक नवीन चॅट थीम बनवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
या चॅट थीममध्ये युजर्सना अनेक कलर ऑप्शन आणि वेगवेगळे वॉलपेपर पाहायला मिळणार आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही चॅट्सला नवीन लूक देऊ शकता. मात्र यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. अनेक युजर्सना ही प्रोसेस माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला याच प्रोसेसबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करून चॅट्स थीम बदलू शकणार आहात.
जर तुम्हाला WhatsApp चॅट्स थीम पुन्हा आधीसारखी करायची असेल किंवा चॅट्स थीम पुन्हा एकदा बदलायची असेल तर वरच्या बाजूला दिसणाऱ्या 3 डॉट्स ऑप्शनवर क्लिक करून रीस्टार्ट थीम ऑप्शन निवडू शकता.
WhatsApp चे किती सक्रिय युजर्स आहेत?
3.14 बिलीयन
WhatsApp ची मालकी कोणाकडे आहे?
मेटा