Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

UPI AutoPay Setting: तुम्ही देखील मोबाईल बिल, विजबिल, ईएमआयसाठी दर महिन्याला पेमेंट करणं विसरता का? आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ऑटोपे सर्विसची मदत घेऊ शकता. गूगल पे आणि फोन पेमध्ये ऑटोपे सेटअप करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 01:37 PM
बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे

Follow Us
Follow Us:
  • यूपीआय ऑटोपेच्या मदतीने मोबाईल बिल, ईएमआय, ओटीटी, विमा आणि इतर नियमित पेमेंट्स आपोआप करता येतात.
  • फोनपेवर प्रोफाइल → पेमेंट सेटिंग्ज → ऑटोपे मध्ये जाऊन संबंधित मँडेट निवडून यूपीआय पिन टाकल्यावर ऑटोपे सेट करता येतो.
  • गुगल पेवर प्रोफाइल → ऑटोपे → पेंडिंगमध्ये जाऊन मँडेट एक्सेप्ट केल्यानंतर यूपीआय पिनद्वारे ऑटोपे सुरू करता येतो.
हल्ली मोबाईल बिल, विजबिल, ईएमआय, ओटीटी सब्सक्रिप्शन, विमा आणि म्यूचुअल फंडसारख्या सर्विससाठी दर महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला पैसे भरावे लागतात. मोबाईल बिल, विजबिल, ईएमआय यांसारख्या सर्विस वापरण्यासाठी दर महिन्याला ठरावीक पैसे खर्च करावे लागतात. पण अनेकदा आपल्याला सर्व पेमेंट्स करणं लक्षात राहत नाही, यामुळे सर्विस बंद होतात आणि अनेक समस्या निर्माण होतात. पण यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन 2020 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआय ऑटोपेची सुविधा सुरु केली आहे. या सर्विसच्या मदतीने तुम्ही कोणत्याही यूपीआय ॲपमध्ये एकदाच ‘मँडेट’ सेट करू शकता आणि यानंतर तुमचे नियमित पेमेंट्स आपोआप पूर्ण होऊ शकतात.

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

या सर्विसमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. जसे की, विलंब शुल्क टाळणे, प्रत्येकवेळी स्वत: पेमेंट न करणं आणि एका सुरक्षित पद्धतीने पेमेंट करणं. विशेष म्हणजेच, क्रेडिट कार्ड बिल, म्यूचुअल फंड आणि इंश्योरेंससाठी देखील तुम्ही एक लाख रुपयांपर्यंतच्या लिमिटसह ऑटोपे सेट करू शकता. विशेष म्हणजेच तुम्ही एखाद्या पेमेंटसाठी कधीही ऑटोपे सर्विस बंद करू शकता. यासाठी कोणतेही जास्तीचे पैसे खर्च करण्याची देखील आवश्यकता नाही. गूगल पे आणि फोन पे वर ऑटोपे कसे सेट केले जाऊ शकते, याची प्रोसेस जाणून घेऊया.

फोन पेवर कसे सेट कराल ऑटोपे?

  • जर तुम्ही फोन पे चा वापर करत असाल तर ऑटोपे सेट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फोन पे ॲप ओपन करा.
  • आता स्क्रीनच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • यानंतर खाली स्क्रॉल करून पेमेंट सेटिंग सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला ऑटोपे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल, जिथे तुम्ही ज्या मँडेटसाठी ‘ऑटो-पे सेट करू इच्छिता, ते निवडू शकता.
  • अखेरीस, ॲप तुम्हाला यूपीआय पिन एंटर करावा सांगेल. पिन एंटर केल्यानंतर ऑटोपे मँडेट सेट होईल आणि यानंतर प्रत्येकवेळी तुमचे पेमेंट ओपआप केले जाईल.
  • गूगल पेवर कसे सेट कराल ऑटोपे?
  • सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये गूगल पे ओपन करा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

यानंतर ऑटोपे सेक्शनवर क्लिक करा.

  • इथे तुम्हाला वेगवेगळ्या सेवांसाठीचे मँडेट्स दिसतील, जे तुम्ही मॅनेज करू शकता.
  • जर तुम्ही एखाद्या खास सर्विससाठी ऑटोपे सेट करणार असाल तर पेंडिंग सेक्शनमध्ये जाऊन ते मँडेट निवडा आणि एक्सेप्ट बटनावर क्लिक करा.
  • आता यूपीआय पिन एंटर करून ऑटोपे सेट करा.

Web Title: How to set up upi autopay on phonepe and google pay for automatic payments tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • phone pay
  • Tech News
  • UPI

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.