Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Smartphone Winter: पावसाळ्यात आणि ऊन्हाळ्यात स्मार्टफोनची काळजी कशी घ्यायची याबाबत प्रत्येकाला माहिती असते. मात्र हिवाळ्यात आपल्या स्मार्टफोनची काळजी कशी घ्यायची, याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 25, 2025 | 11:59 AM
Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात अशा प्रकारे फोन वापरू नका!
  • चुकीच्या वापरामुळे फोनचा डेटा होऊ शकतो डिलीट
  • जाणून घ्या काही महत्त्वाच्या स्मार्टफोन टिप्स
Smartphone Care In Winter: आपण ऊन्हाळ्यात आपला स्मार्टफोन जास्त गरम होऊ नये म्हणून आणि पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनमध्ये पाणी जाऊ नये, म्हणून त्याची प्रचंड काळजी घेतो. पण हिवाळ्याच काय? ज्याप्रमाणे ऊन्हाळ्यात आणि पावसाळ्यात स्मार्टफोनची काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणे हिवाळ्यात देखील आपल्या स्मार्टफोनची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना हिवाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं अत्यंत सामान्य वाटतं. पण याचा परिणाम स्मार्टफोनचा परफॉर्मंस, बॅटरी आणि डेटा सिक्योरिटीवर होण्याची शक्यता असते.

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

अनेकदा आपण नकळतपणे अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर परिणाम होतो. विशेषत: अत्यंत थंड वतावरणात आपल्या स्मार्टफोनचा चुकीचा वापर तुमचा डेटा धोक्यात आणू शकतो. हिवाळ्यात स्मार्टफोनचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

थंडीत वारंवार फोनचा वापर करणं

हिवाळ्यात ज्याप्रमाणे वातावरणातील तापमान कमी होते, त्याचप्रमाणे फोनचे इंटरनल तापमान देखील अत्यंत वेगाने कमी होते.
थंड वातावरणातून तुम्ही फोनला अचानक एखाद्या गरम खोलीत घेऊन गेलात तर अचानक तापमान बदलल्यामुळे फोनवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे फोनमध्ये ओलावा जमा होतो, ज्यामुळे बॅटरी, प्रोसेसर आणि स्टोरेज चिपचे नुकसान होते. या ओलाव्यामुळे कधीकधी डेटा करप्ट होऊ शकतो आणि फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स डिलीट होऊ शकतात.

अत्यंत थंड वातावरणात फोन चार्ज करणं

कमी तापमानात फोन चार्ज करणं धोकादायक मानलं जातं. थंडीत लिथियम-आयन बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया अत्यंत स्लो होते. ज्यामुळे चार्जिंग योग्य पद्धतीने होत नाही. जर तुमचा फोन खूप थंड असेल आणि तुम्ही त्याला लगेच चार्जिंगला लावला तर यामुळे फोनची बॅटरी सेल खराब होऊ शकते आणि फोन अचानक बंद होऊन तुमच्या फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स करप्ट होऊ शकतात.

कोणत्याही सुरक्षेशिवाय थंडीत फोनचा वापर करणं

हिवाळ्यात ग्लव्स घालून फोनचा वापर करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे असे अनेक लोकंं असतात जे हिवाळ्यात फोनला कोणतीही सुरक्षा देत नाहीत. मात्र अधिक थंड स्क्रीनमुळे टच सेंसिटिविटीवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी फोन फ्रीज होतो आणि चुकीच्या कमांड मिळतात, याचा परिणाम म्हणजे अ‍ॅप्स क्रॅश होतात आणि सिस्टम फाइल्स करप्ट होऊ शकतात, ज्यामुळे सर्व डेटा धोक्यात येतो.

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली आहे का? मग चुकुनही करू नका ‘हे’ कामं, नाहीतर डबल होईल खर्च

जास्त बॅटरी संपण्याचा आणि डेटा करप्शनचा धोका

थंडीत फोनची बॅटरी इतर दिवसांपेक्षा अधिक वेगाने संपते. जर फोन सतत बंद-चालू होत असेल तर याचा परिणाम इंटरनल स्टोरेजवर होतो. अशा परिस्थितीत फाईल्स सिस्टिम करप्ट होण्याची शक्यता अधिक वाढते. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर काम करत असाल आणि फोन अचानक बंद झाला तर तुमचा संपूर्ण डेटा डिलीट होऊ शकतो.

  • हिवाळ्यात कशी घ्याल फोनची काळजी?
  • फोनला खिशात किंवा कव्हरमध्ये ठेवा.
  • अतिशय थंड वातावरणात फोन चार्ज करू नका.
  • अचानक तापमान बदलामुळे फोन खराब होऊ शकतो.
  • तुमचा बॅकअप नेहमी सुरु ठेवा, ज्यामुळे डेटा सुरक्षित राहणार आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात स्मार्टफोन पटकन बंद का होतो?

    Ans: हिवाळ्यात लिथियम-आयन बॅटरीचे परफॉर्मन्स कमी होते आणि फोन ऑटोमॅटिक शटडाउन होऊ शकतो.

  • Que: खूप थंड वातावरणात फोन वापरणे धोकादायक आहे का?

    Ans: अत्यंत कमी तापमानामुळे बॅटरी, स्क्रीन आणि इंटरनल पार्ट्सना नुकसान होऊ शकते.

  • Que: थंड फोन अचानक गरम ठिकाणी नेल्यास काय धोका?

    Ans: यामुळे आंतरिक ‘कंडेन्सेशन’ तयार होऊन सर्किट्सला नुकसान होऊ शकते.

Web Title: How to take care of your smartphone during winter season know some tech tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
1

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
2

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं
3

Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल ‘हे’ मोठे नुकसान
4

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल ‘हे’ मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.