Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
क्रोमा ब्लॅक फ्रायडे सेल 2025 22 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. यातील एक डिल म्हणजे आयफोन 16. क्रोमा सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 16 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता आम्ही तुम्हाला आयफोन 16 वरील डिल्स आणि या मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
क्रोमावर सुरु असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेल 2025 मध्ये ग्राहक आयफोन 16 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. आयफोन सुमारे 13 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह लिस्ट करण्यात आला आहे. हे आयफोन मॉडेल 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता सेलमध्ये हा मॉडेल 13 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह 66,490 रुपयांत लिस्टेड आहे. याशिवाय ग्राहक या आयफोनच्या खरेदीवर बँक डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि डिस्काऊंट कूपनचा वापर करून किंमत आणखी कमी करू शकतात. म्हणजेच ग्राहक सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन 16 सुमारे 40 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही दमदार लूक आणि शानदार कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली संधी असणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासोबत HDR कंटेट सपोर्ट आणि 2,000 निट्सची पीक ब्राइटनेस देखील आहे. या फोनमध्ये A18 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो मल्टीटास्किंग आणि ऐप्पल इंटेलीजेंस फीचर्ससह यूजर्सना अधिक चांगला अनुभव देतो. हाय परफॉर्मेंससह हा प्रोसेसर एफिशिएंट आणि अपकमिंग सॉफ्टवेअर अपडेटसाठी कंपेटिबल देखील आहे.
Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं
आयफोन 16 च्या रियरमध्ये 48MP चा फ्यूजन कॅमेरा आणि 12MP चा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या फ्रंटला 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर, अॅपलचा दावा आहे की हा आयफोन पूर्ण चार्ज केल्यानंतर 22 तासांच्या व्हिडिओ प्लेबॅकला सपोर्ट करतो. गेल्या वर्षी हा आयफोन 79,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.
Ans: लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, होम अप्लायन्सेस, हेडफोन्स, स्मार्टवॉच, गेमिंग अॅक्सेसरीजवर मोठ्या सूट मिळतात.
Ans: होय, अनेक ऑफर्स एकसारख्या असतात, पण काही एक्सक्लुझिव्ह डील्स फक्त ऑनलाइन किंवा फक्त स्टोअरमध्ये दिल्या जातात.
Ans: होय, बहुतांश वर्षी iPhone मॉडेल्सवर सवलत आणि bank cashback ऑफर्स मिळतात.






