Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली आहे का? मग चुकुनही करू नका 'हे' कामं, नाहीतर डबल होईल खर्च
स्क्रीन तुटल्यानंतर फोनचा वापर करणं अत्यंत कठीण होतं. त्यामुळे असे काही लोकं असतात जे घरीच फोनची स्क्रीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपले पैसे वाचतील आणि स्क्रीन मोफत दुरुस्त केली जाऊ शकेल असं अनेकांना वाटतं, पण खरं तर यामुळे आणखी नुकसान होऊ शकतं. यामुळे स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला आणखी जास्त खर्च करावा लागू शकतो. स्क्रीन तुटल्यानंतर स्मार्टफोनची जास्त काळजी घ्यावी लागते, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही स्मार्टफोनच्या तुटलेल्या स्क्रीनसोबत छेडछाड केली तर यामुळे डिस्प्ले पॅनल खराब होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. यामुळे तुटलेल्या स्क्रीनसोबत छेडछाड करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याव्यतिरिक्त, तुटलेल्या स्क्रीनमुळे काचेचे तुकडे तयार होऊ शकतात जे तुमच्या हातांना टोचू शकतात आणि दुखापत करू शकतात.
हल्ली आपलं प्रत्येक काम फोनवर होतं. फोनशिवाय आपलं कोणतंही कामं पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन तुटली असेल तर अनेक कामं अडू शकतात आणि यामुळे असे अनेक लोकं असतात जे स्मार्टफोनचा वापर करतात. पण अशा परिस्थितीत स्मार्टफोनचा वापर करणं धोकादायक ठरू शकत आणि यामुळे स्मार्टफोनचे दुसरे पार्ट्स देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे फोनचा वापर करणं टाळा.
अनेक लोकं असे असतात जे स्मार्टफोनची स्क्रीन तुटल्यानंतर घरीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. मात्र जर तुम्ही टेक्निशियन नसाल तर युट्यूब व्हिडीओ पाहून स्मार्टफोनची स्क्रीन दुरुस्त करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. फोन दुरुस्तीसाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो आणि तुमचा फोन दुरुस्त करण्यापेक्षा तो खराब होऊ शकतो.
तुमचा फोन खाली पडल्याने स्क्रीन तसेच इतर घटकांचे नुकसान होऊ शकते. म्हणून, स्क्रीन तुटल्यानंतरही तुमचा फोन काम करत असला तरीही, सावधगिरी बाळगा आणि तो चार्ज करणे टाळा.






