
Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं
ग्लू वॉलच्या मागे थांबून तुम्ही शत्रुंपासून तुमचे रक्षण करू शकता. तुम्हाला जर डायमंड खर्च करून ग्लू वॉल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला प्रचंड डायमंड खर्च करावे लागू शकतात. पण तुम्ही रेडीम कोड्स आणि डेली स्पेशल सेक्शनमध्ये तुम्हाला ग्लू वॉल अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून खरेदी करता येणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वाचून तुम्ही गेममध्ये ग्लू वॉलचा योग्य वापर करू शकता. ज्यामुळे शत्रूंपासून तुमचं रक्षण होईल आणि तुम्ही गेममध्ये दिर्घकाळ टिकू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्स मॅच दरम्यान ग्लू वॉल थेट प्लेस करू नका. याऐवजी थोडा बाजूला ग्लू वॉल प्लेस करा. या ग्लू वॉलच्या मदतीने तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी मदत होणार आहे.
गरेना फ्री फायर मॅक्समध्ये केल्या जाणाऱ्या धोकादायक गन फाईट्समध्ये तुम्ही केवळ ग्लू वॉलचा वापर करून शत्रूंपासून तुमचे रक्षण करू शकता. पण यासाठी तुम्हाला लवकरात लवकर वॉल प्लेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही फायर बटणच्या जवळ ग्लू वॉल बटण सेट करू शकता. यामुळे तुम्ही हेवी फायरिंगच्यावेळी ग्लू वॉल सेट करून शत्रूंपासून तुमचे रक्षण करू शकणार आहात.
ग्लू वॉलचा वापर करून तुम्ही सरप्राइज अटॅक देखील करू शकणार आहात. यासाठी अटॅक करण्यापूर्वी तुमच्या शत्रूंच्या समोर ग्लू वॉल प्लेस करा. मग, तुमची प्लेस बदला आणि वेगळ्या एंगलमधून हल्ला करा. यामुळे शत्रूला सावरण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि त्याचा परिणाम जलद नॉकआउटमध्ये होईल.
जर तुम्ही विरोधी संघाविरुद्ध खेळत असाल तर एकच ग्लू वॉल तुमचे रक्षण करू शकणार नाही. तुमच्या संघाचे रक्षण करण्यासाठी एका ग्लू वॉलच्या मागे दुसरी ग्लू वॉल ठेवा. हे वॉल मजबूत करेल, तुम्हाला स्वतःला बरे करण्याची, तुमची बंदूक लोड करण्याची आणि तुमच्या पुढील हालचालीची योजना करण्याची संधी देईल.