HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी
HTC Vive Eagle आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्मार्ट ग्लासेस गुरुवारी लाँच करण्यात आले आहेत. हे डिव्हाईस HTC च्या डिस्प्ले-लेस स्मार्ट ग्लासेस कॅटेगरीमध्ये एंट्री करतात. या डिव्हाईसमध्ये इन-बिल्ट AI असिस्टेंट आहे, जो Google च्या Gemini किंवा OpenAI च्या GPT ला पावर देतो. HTC Vive Eagle यूजर्सला म्यूजिक ऐकण्यासाठी, AI असिस्टेंटला प्रश्न विचारण्यासाठी, फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी,आणि साइनबोर्ड आणि इमेज ट्रांसलेट करण्याची सुविधा देतात, हे सर्व केवळ व्हॉईस कमांडद्वारे केले जाऊ शकते.
HTC Vive Eagle हे NT$15,600 म्हणजेच सुमारे 45,500 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. सध्या हे स्मार्ट ग्लासेस केवळ तैवानमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जिथे लोक 2020EYEhaus आणि निवडक तैवान मोबाईल स्टोअर्समधून ते वापरून पाहू शकतात. एआय स्मार्ट ग्लासेस चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बेरी, काळा, कॉफी आणि राखाडी यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – X)
HTC चे Vive Eagle एक वेफेयरर-स्टाइल AI स्मार्ट ग्लास आहे, ज्याचे वजन लेंससह 48.8 ग्रॅम आणि लेंसशिवाय 42.8 ग्रॅम आहे. या डिव्हाईसमध्ये Snapdragon AR1 Gen 1 चिपसेट, 4GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्ट ग्लासेसमध्ये 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे, जो 3024 x 4032p रेजोल्यूशनमध्ये इमेज आणि 1512 x 2016p रेजोल्यूशनवर 30fps मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करतो. यामध्ये Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंस देण्यात आले आहे.
ऑडियो सेटअपबद्दल बोलायचं झालं तर HTC Vive Eagle मध्ये बीमफॉर्मिंग माइक्रोफोन एरे देण्यात आले आहे, ज्यामध्ये एक डायरेक्शनल आणि तीन ऑम्नी-डायरेक्शनल माइक्रोफोन आहे. यामध्ये 2 ओपन-ईयर स्टीरियो स्पीकर्स देखील देण्यात आले आहेत. डावीकडे एक LED इंडिकेटर आहे, जो फोटो क्लिक किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी उपयुक्त आहे.
HTC Vive Eagle स्मार्ट ग्लासेसमध्ये 235mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे डिव्हाईस 36 तासांहून जास्त स्टँडबाय टाईम आणि 4.5 तासांहून अधिक म्यूझिक प्लेबॅक देते. यामध्ये चार्जिंग केबल देखील देण्यात आली आहे, जी 1 ते 50 टक्के केवळ 10 मिनिटांत चार्ज आणि 80 टक्के चार्ज करण्यासाठी 23 मिनिटांचा कालावधी घेते.
याशिवाय, AI ग्लासेसमध्ये कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 चा सपोर्ट देण्यात आला आहे, आणि याला IP54 रेटिंग मिळली आहेे, जे डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच या AI ग्लासेसला स्मार्टफोनसोबत जोडणं अत्यंत गरजेचं आहे.