यूनिक डिजाइनसह Huawei चा फोल्डेबल फोन बाजारात घालतोय धुमाकूळ, 6.3-इंच इनर स्क्रीन आणि टेलीफोटो कॅमेऱ्याने सुसज्ज
शेनझेन-बेस्ड मॅन्युफॅक्चररचा नवीनतम फोल्डेबल फोन Huawei Pura X चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोल्डेबल इतर स्मार्टफोन्सप्रमाणे नाही तर एका यूनिक डिजाइनसह लाँच केला आहे. स्मार्टफोनची डिझाईन अशी आहे की, पाहता क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. हा क्लॅमशेल फोल्डेबल फोन 16:10 आस्पेक्ट रेशियोसह 6.3-इंच इनर स्क्रीन देतो, जो या श्रेणीतील सर्वात रुंद आहे.
लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 90 हजारांच्या घरात आहे. स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे कलेक्टर देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. थोडक्यात काय तर हा स्मार्टफोन हाय रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला तर मग आता स्मार्टफोनच्या किंमती, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Huawei Pura X स्मार्टफोन 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 89,000 रुपये आणि फोनच्या 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 95,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन मून शॅडो ग्रे, मॅजिक नाईट ब्लॅक, स्टायलिश रेड, स्टायलिश ग्रीन आणि झिरो व्हाइट रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि डिलिव्हरी 21 मार्चपासून सुरू होईल.
Huawei ने Pura X चे Collector’s Edition देखील सादर केले आहे. स्मार्टफोनचे हे एडिशन 16GB + 512GB आणि 16GB + 1TB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या एडीशनमध्ये तिरंगी बॅक कव्हर डिझाइन आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन वैशिष्ट्य आहे. Huawei Pura X Collector’s Edition च्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,08,000 रुपये आणि 16GB + 1TB म्हणजेच सुमारे CNY 9,999 म्हणजेच सुमारे 1,19,000 रुपये आहे.
Huawei Pura X हा HarmonyOS 5.0.1 वर चालतो आणि त्यात 1,320×2,120 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.3-इंचाचा इनर OLED LTPO 2.0 डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 16:10 चा विस्तृत आस्पेक्ट रेशियो आहे, जे या क्लॅमशेल फोल्डेबलचे मुख्य आकर्षण आहेत. विस्तृत आस्पेक्ट रेशियोमुळे युजर्सना स्टँडर्ड 21:9 फ्लिप फोनपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कंटेंटचा आनंद घेता येतो. एक्सटर्नल डिस्प्ले 3.5-इंच आहे ज्याचे रिझोल्यूशन 980 × 980 पिक्सेल आहे आणि 120Hz LTPO 2.0 अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. दोन्ही स्क्रीनमध्ये 1440Hz उच्च-फ्रिक्वेन्सी PWM डिमिंग आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. ब्रँडने अद्याप स्मार्टफोनमधील चिपसेटबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असं सांगितंल जात आहे की, ते Kirin 9010 चा एक व्हेरिअंट असू शकते.
फोटोग्राफीसाठी, Huawei Pura X मध्ये ट्रिपल आउटवर्ड-फेसिंग कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह), 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल मॅक्रो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा (OIS सह) आहे. इनर स्क्रीनवर 10.7-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे. त्याचे बिल्ड IPX8-रेटेड आहे, जे वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस आहे.
Huawei Pura X वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 802.11a/b/g/n/ac/ax/be, Bluetooth 5.2, GPS/AGPS, NFC, GLONASS, Beidou, NavIC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यात अॅम्बियंट लाईट सेन्सर, कलर टेम्परेचर सेन्सर, जेश्चर सेन्सर, ग्रॅव्हिटी सेन्सर, इन्फ्रारेड (IR) सेन्सर, हॉल सेन्सर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहेत.
iPhone नंतर आता Apple च्या या प्रोडक्टचीही भारतात होणार निर्मिती, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या
ऑथेंटिकेशनसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Huawei Pura X Collector’s Edition सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचर (Tiantong) ऑफर करतो. Huawei Pura X मध्ये 4,720mAh बॅटरी आहे जी 66W वायर्ड चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.