Android OS Update: लाखो OnePlus युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, कंपनीने पोस्ट शेअर करत दिली महत्त्वाची माहिती
OnePlus युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून OnePlus 13 आणि OnePlus 13R युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून हा गोंधळ दूर केला आहे. खरं तर OnePlus ने अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोनसाठी त्यांची पॉलिसी अपडेट केली आहे. मात्र या अपडेटमुळे युजर्समध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. कारण कंपनी OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोन्ससाठी किती अपडेट जारी करणार, याबाबत युजर्समध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता युजर्सची चिंता दूर झाली आहे.
भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय
OnePlus ने अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोनसाठी त्यांची पॉलिसी अपडेट केली आहे, ज्यामध्ये युजर्सना किती Android अपडेट मिळू शकतात हे सांगितले आहे. सुरुवातीला एका अहवालात दावा करण्यात आला होता की प्री-इंस्टॉल केलेले अँड्रॉइड वर्जन कंपनीने वचन दिलेल्या चार अपडेट्सपैकी एक आहे आणि त्याची या 4 अपडेट्समध्ये गणना केली जाईल. त्यामुळे खरेदीदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तथापि, वनप्लसने आता ही समस्या दूर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, OnePlus स्मार्टफोनसाठी आमच्या सॉफ्टवेअर अपडेट धोरणाबाबत अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या गैरसमजुती आम्ही दूर करू इच्छितो. आमच्या लक्षात आले आहे की आमच्या डिव्हाइससाठी प्रदान केलेल्या Android OS अपडेट्सच्या संख्येबद्दल काही गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामध्ये नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 13 सिरीजचा समावेश आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, OnePlus 13 सिरीजमध्ये लाँचच्या वेळी प्री-इंस्टॉल केलेले प्रारंभिक Android OS वर्जनची पहिले अपडेट म्हणून गणना केली जाणार नाही. याचा अर्थ चार Android अपग्रेड आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून OnePlus 13 सिरीज युजर्स Android 16, Android 17, Android 18, Android 19 मिळण्याची अपेक्षा करू शकतात.
— OnePlus India (@OnePlus_IN) March 5, 2025
कंपनीने पुष्टी केली आहे की OnePlus 13 आणि 13R दोन्हींना Android 16 पासून सुरू होणारे चार प्रमुख Android अपडेट मिळतील. जरी ही डिव्हाईस अँड्रॉइड 15-बेस्ड ऑक्सीजनओएस 15 सह येतात, तरी OnePlus ने स्पष्ट केले की प्री-इंस्टॉल केलेले सॉफ्टवेअर चार वर्षांच्या अपग्रेड सर्कलमध्ये मोजले जाणार नाही. त्यामुळे, आता युजर्सना फोनमध्ये Android 19 पर्यंतचे अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच, फोनना सहा वर्षांसाठी सुरक्षा पॅच देखील मिळणार आहेत.
स्मार्टफोन व्यतिरिक्त, वनप्लसने त्यांच्या स्मार्टवॉचबद्दल माहिती देखील शेअर केली आहे. वनप्लस वॉच 2 आणि वॉच 3 या दोन्हींना तीन वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट मिळतील. WearOS 4 सोबत येणाऱ्या वॉच 2 ला WearOS 6 पर्यंतचे अपडेट्स तसेच 2026 मध्ये संपणाऱ्या तीन वर्षांसाठी तिमाही सुरक्षा पॅचेस मिळतील. WearOS 5 सह लाँच होणाऱ्या वॉच 3 ला WearOS 7 पर्यंतचे अपडेट्स देखील मिळतील, ज्यामध्ये त्रैमासिक सुरक्षा पॅच 2027 पर्यंत असतील.