Flipkart Big Saving Days Sale: सुरु झालाय फ्लिपकार्ट सेल, iPhone पासून स्मार्ट टिव्हीपर्यंत सर्व काही खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये
लोकप्रिय आणि आघाडीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म प्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरु झाला आहे. हा सेल आज 7 मार्चपासून सुरु झाला आहे. या सेलची शेवटची तारीख 13 मार्च आहे. म्हणजेच हा सेल 7 दिवस सुरु राहणार आहे. या सेलमध्ये तुम्ही होळीची शॉपिंग देखील करू शकता. त्यामुळे फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या या सेलला बिग सेव्हिंग डेज सेलसोबतच फ्लिपकार्ट होळी सेल देखील म्हटलं जाऊ शकतं.
MWC 2025: Camon 40 सिरीजचं ईव्हेंटमध्ये अनावरण, वन टॅप बटन आणि AI फीचर्सने सुसज्ज
फ्लिपकार्ट सेलमध्ये, तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्ससह अनेक डिव्हाईसवर उत्तम सूट मिळू शकेल. ज्यांना त्यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप अपग्रेड करायचा आहे किंवा नवीन गॅझेट खरेदी करायचे असेल, त्यांना या सेलमध्ये उत्तम डील मिळवण्याची संधी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्टवर हा सेल आता लाईव्ह झाला आहे. त्यामुळे तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह कपडे, होम अप्लायंसेस आणि गॅझेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदी करून तुम्ही मोठी बचत करू शकता. तुम्ही ज्या वस्तू आतापर्यंत तुमच्या कार्टमध्ये आणि My Wishlist मध्ये अॅड केल्या असतील त्या आता खरेदी करण्याची वेळ आली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला iPhone 16 सीरीज, सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज आणि नथिंग फोन 2a प्लस हे स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
खरेदी अधिक आकर्षक बनवण्यासाठी फ्लिपकार्टने एचडीएफसी आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना 10% त्वरित सूट मिळेल, तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, उत्तम एक्सचेंज डील देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे ब्रँडेड डिव्हाईस स्वस्त दरात खरेदी करता येतील आणि खरेदीचा अनुभव आणखी चांगला होईल.
हा सेल केवळ इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स पुरताच मर्यादित नाही, ग्राहक लाईफस्टाईल प्रोडक्ट्सवर देखील उत्तम ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. फॅशन प्रेमींना त्यांच्या खरेदीवर 60% पर्यंत टॉप ब्रँडचे हँडबॅग्ज खरेदी करता येणार आहेत. इतकेच नाही तर पर्सनल केयर आइटम्सवर 65% पर्यंत सूट मिळेल.
फ्लिपकार्टच्या या सेल दरम्यान, iPhone 16 ज्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे, तो 68,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. अशाप्रकारे, कंपनी या आयफोनच्या खरेदीवर 10,901 रुपयांची सूट देत आहे. या सेल दरम्यान, Galaxy S24 हा 52,999 रुपयांना खरेदी करता येईल आणि त्याच्या प्लस व्हेरिअंटसाठी फक्त 2,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. सेलमध्ये Nothing Phone 2a आणि Phone 2a Plus वरही चांगले डिस्काउंट मिळत आहेत. सर्व ऑफर्सनंतर दोन्ही फोन अनुक्रमे 19,999 रुपये आणि 25,499 रुपयांना खरेदी करता येतील. याशिवाय, Moto Edge 50, Moto G85 आणि Poco X6 Pro यासह अनेक मॉडेल्सवर उत्तम सूट मिळू शकते.