भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय
गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरून 180 हून अधिक अॅप्स हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. युट्यूबने प्लॅटफॉर्मवरून 29 लाख व्हिडिओ हटवले असून 48 लाख चॅनेल्स बंद केले आहेत. YouTube च्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंबाबत हा कठोर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयबाबत कंपनीने एक अहवाल देखील जारी केला आहे.
अहवालात YouTube ने म्हटलं आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, YouTube च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे 29 लाख व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले. तर कंटेंट उल्लंघनामुळे, YouTube 48 लाख चॅनेल्सवर देखील कारवाई केली आहे. YouTube ने आतापर्यंत प्लॅटफॉर्मवरून हटवलेल्या व्हिडीओंची ही सर्वात मोठी संख्या आहे. कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, हे व्हिडिओ ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. यापैकी बहुतेक व्हिडिओ भारतीय क्रिएटर्सनी अपलोड केले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, मागील तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्यांहून जास्त व्हिडिओ हटवण्यात आले. 2020 पासून, YouTube भारतात त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वाधिक व्हिडिओ हटवत आहे. भारतानंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. YouTube ने म्हटले आहे की त्यांची ऑटोमॅटेड कंटेट मॉडरेशन टूल त्यांच्या नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ ओळखतात. या टूलने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 99.7 टक्के व्हिडिओंना फ्लॅग केले आणि यानंतर कंपनीने हे व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
यूट्यूबच्या मते, हटवलेले व्हिडिओ कंपनीच्या कंटेंट पॉलिसीच्या विरुद्ध होते. यापैकी 30 लाख व्हिडिओ भारतीय क्रिएटर्सनी अपलोड केले होते. या व्हिडिओंमध्ये द्वेषपूर्ण स्पीच, अफवा आणि छळ अशा प्रकारच्या कंटेटचा समावेश होता. जे धोरणाचे उल्लंघन करत होते. यामुळे हे व्हिडीओ हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कंपनीने 4.8 दशलक्षाहून अधिक म्हणजे 48 लाख चॅनेल देखील काढून टाकले आहेत. या चॅनेल्सवर बनावट व्हिडिओ अपलोड केले जात होते. काही चॅनेलमध्ये कॉपीराइट केलेला कंटेट आढळल्यामुळे कंपनीने चॅनेल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेषयुक्त भाषण किंवा अपशब्द यांचा वापर, अश्लील कंटेट अपलोड करणं आणि जाहिरात धोरणांचे उल्लंघन या कारणांमुळे 48 लाख चॅनेल्स बंद करण्यात आले आहेत.
भारतासोबतच, YouTube ने जगातील इतर देशांमधून नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. यापैकी 81.7 टक्के व्हिडिओमध्ये स्कॅम, दिशाभूल करणारे आणि स्पॅम असल्याने काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे, छळामुळे 6.6 टक्के व्हिडिओ, मुलांच्या सुरक्षेमुळे 5.9 टक्के आणि हिंसाचारामुळे 3.7 टक्के व्हिडिओ काढून टाकण्यात आले. हे व्हिडिओ काढून टाकण्यासोबतच, कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सुमारे 48 लाख चॅनेल देखील बंद केले आहेत. याशिवाय, धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या 130 कोटी कमेंट देखील डिलीट करण्यात आल्या आहेत.