
BSNL Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार 14 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडीटी, इतकी आहे किंमत
एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, कंपनीने अलीकडेच 997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनसाठी कंपनी एक स्पेशल ऑफर घेऊन आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. पण कंपनीने एक खास ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडिटी मिळणार आहे. म्हणजेच आता 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता यूजर्सना 164 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Extend your festive connections with BSNL’s Holi Special Offer. Recharge ₹997 and get:
• 2GB Data / Day
• Unlimited Calls
• 150 + 14 Days Validity The best part of every celebration is staying connected. Offer valid till 31 March 2026.#BSNL #HoliSpecial #StayConnected… pic.twitter.com/yHy169CmaZ — BSNL India (@BSNLCorporate) March 9, 2026
याशिवाय, कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाई स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. व्हॅलिडीटी वाढवल्यानंतर यूजर्सना आता 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300GB ऐवजी 328GB डेटा ऑफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, या योजनेत यूजर्सना दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. मोफत ऑफर म्हणून, यूजर्सना BiTV चा अॅक्सेस देखील मिळतो.
बीएसएनएल एक स्वस्त डेटा प्लॅन देखील लाँच केला आहे. हा डेटा पॅक फक्त 16 रुपयांमध्ये येतो आणि 1 दिवसाची व्हॅलिडीटी ऑफर करतो. बीएसएनएलच्या या डेटा पॅकमध्ये यूजर्सना एकूण 4 जीबी डेटा ऑफर केला जातो, म्हणजेच यूजर्स फक्त 4 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा मिळवू शकतात. कंपनीने हा डेटा पॅक 8 मार्च रोजी, नुकत्याच संपलेल्या आयसीसी टी 20 विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीच्या दिवशी लाँच केला.