Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित
बंगळुरुमध्ये 5,032 स्क्वेयर फीटमध्ये नथिंग स्टोअर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्सससह ऑफिशियल नथिंग मर्चेंडाइज देखील आहेत, ज्यामध्ये कपडे देखील उपलब्ध आहेत. हे स्टोअर 660/1, 100 फूट रोड, फर्स्ट स्टेज, इंदिरानगर, बेंगळुरू येथे आहे आणि ते दररोज सकाळी 11:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या लाँचबाबत सांगताना नथिंगचे को-फाउंडर आणि इंडिया प्रेसिडेंट, अकिस इवेंजेलिडिस म्हणाले की, आमच्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन नथिंगसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत झाले आहे. (फोटो सौजन्य – X)
7:08 AM
📍Nothing Store, Bengaluru pic.twitter.com/F6xBnDkTkQ — Nothing India (@nothingindia) February 14, 2026
बंगळुरुमध्ये ओपन करण्यात आलेले स्टोअर एक इमर्सिव हब असल्याचे ब्रँडचे म्हणणे आहे. ज्याला ट्रेडिशनल पॉइंट-ऑफ-सेल रिटेल आउटलेटऐवजी हँड्स-ऑन प्रोडक्ट डिस्कवरी, कम्युनिटी एंगेजमेंट आणि स्टोरीटेलिंगसाठी डिझाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्राहक नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्सची संपूर्ण लाईनअप पाहू शकणार आहेत, ज्यामध्ये स्मार्टफोन, ऑडियो, स्मार्टवॉच आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. खरेदी केलेल्या हँडसेटवर स्क्रीन प्रोटेक्टर फिट करण्यासाठी खास इक्विपमेंट देखील आहे. याशिवाय, ग्राहक स्टोअरमध्ये वेंडिंग मशीन, क्लॉ गेम्स आणि कन्वेयर-बेल्ट प्रोडक्ट डिस्प्लेचा अनुभव घेऊ शकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुमध्ये ओपन करण्यात आलेल्या नथिंग स्टोअरचे डिझाईन 1970 च्या दशकातील रेट्रो-फ्यूचरिस्टिक असेंबली लाइन आणि वर्कशॉपमधून प्रेरित आहे. काँक्रीट, अॅल्युमिनियम, स्टील आणि ग्लास सारखे साहित्य इथे खुले ठेवण्यात आले आहे, जे नथिंगच्या ट्रांसपेरेंसी-लेड डिझाइन तत्वज्ञानाशी जुळते. बंगळुरु स्टोअर ग्राहकांना एक्सपीरिएंशियल आणि सर्विस-लेड फीचर्स देखील ऑफर करणार आहे. एक डेडिकेटेड स्टूडियो स्पेस आहे, जिथे क्रिएटर्स अनबॉक्सिंग आणि हँड्स-ऑन व्हिडीओ कंटेट शूट करू शकणार आहेत. तसेच ईव्हेंट्स आणि अनौपचारिक संभाषणांसाठी कंपनीने स्टोअरमध्ये एक कम्युनिटी हँगआउट झोन देखील तयार केला आहे, यासोबतच स्टोअरला भेट देणाऱ्यांसाठी कॉम्प्लिमेंट्री ड्रिंक्स आणि स्नॅक्स देखील आहेत.






