Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष

India Mobile Congress 2025: इंडिया मोबाइल कांग्रेस एक टेक्नोलॉजी ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये दरवर्षी देशातील अनेक मोठ्या टेक कंपन्या सहभागी होतात. इंडिया मोबाइल कांग्रेस इवेंटमध्ये टेलीकॉमवर विशेष लक्ष दिलं जातं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 08, 2025 | 11:07 AM
IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष

IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • यशोभूमीत इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2025 चे आयोजन
  • कार्यक्रमासाठीस मोठंमोठ्या दिग्गज्यांची उपस्थिती
  • पंतप्रधान नरेंद्री मोदींनी केलं ईव्हेंटचे उद्घाटन

भारताच्या डिजिटल आणि मोबाइल टेक्नोलॉजीच्या जगातील सर्वात मोठ्या ईव्हेंटचे आज आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजी इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2025 च्या 9 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे. दिल्लीतील यशोभूमीमध्ये इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठीस मोठंमोठ्या दिग्गज्यांनी उपस्थिती लावली आहे. केंद्रीय दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी आणि भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल हे देखील आता कार्यक्रमस्थळी पोहोचले आहे.

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स

सॅटेलाइट कम्यूनिकेशनकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्लीमध्ये आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, मीडिया आणि टेक्नोलॉजी प्रोग्राम, इंडिया मोबाइल कांग्रेसच्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात झाली आहे. हा ईव्हेंट 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ईव्हेंटमध्ये टेलीकॉम आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष SATCOM म्हणजेच सॅटेलाइट कम्यूनिकेशन कडे लागले आहे. भारत सरकार देखील याविषयी प्रचंड उत्सुक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पंतप्रधान मोदींनी शेअर केली पोस्ट

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती देखील दिला आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:45 वाजता, मी यशोभूमी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत “नवोपक्रमातून परिवर्तन” या विषयावर चर्चा होईल. हे व्यासपीठ भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकेल आणि या क्षेत्रातील वाढीला चालना देण्याच्या मार्गांवर देखील चर्चा करेल.

6G विजनवर सर्वांचं लक्ष

यावर्षी IMC मध्ये भारतातील 6G विजनवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर वाढावा यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय सॅटेलाइट इंटरनेटवर भारताची काय भुमिका आहे, याबाबत देखील माहिती दिली जाणाक आहे. इंडिया मोबाइल कांग्रेस डिजिटल क्षेत्रात भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतीक असलेले हे आशियाई आणि जागतिक तंत्रज्ञान परिषद म्हणून उदयास आले आहे.

काय आहे यंदाची थीम?

IMC ची यावर्षीची थीम इनोवेट टु ट्रांसफॉर्म अशी ठेवण्यात आली आहे. हे इंडियाच्या डिजिटल ट्रांसफॉर्मेंशन देखील दर्शविते. 4 दिवस चालणाऱ्या या ईव्हेंटमध्ये टेक कंपन्या त्यांचे प्रोडक्ट्स, सर्विसेज आणि इनोवेशन्स सादर करणार आहेत. IMC ईव्हेंटमध्ये ऑप्टिकल कम्यूनिकेशन्स, सेमिकंडक्टर्स, क्वॉन्टम कम्यूनिकेशन, 6G आणि फ्रॉड रिस्क इंडिकेटर्सवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासोबतच यावेळी नेक्स्ट जेनेरेशन कनेक्टिविटीसह साइबर फ्रॉड प्रिवेंशनबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे काम केले जाणार आहे.

Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज… नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!

इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) च्या या ईव्हेंटमध्ये 150 हून अधिक देशांमधून 1.5 लाख अधिक पाहूणे, 7,000 हून अधिक जागतिक प्रतिनिधी आणि 400 हून अधिक कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 5जी-6जी, एआई, स्मार्ट मोबिलिटी, साइबर सुरक्षा, क्वांटम कंप्यूटिंग आणि ग्रीन टेक्नोलॉजी (हरित प्रौद्योगिकी) सारख्या क्षेत्रात 100 हून अधिक सत्रे आणि 800 हून अधिक स्पीकर्सद्वारे 1,600 हून अधिक नवीन वापर-केस प्रदर्शित केले जातील.

FAQs (संबंधित प्रश्न)

IMC चा फुल फॉर्म काय आहे?
इंडिया मोबाइल कांग्रेस

2025 चा IMC ईव्हेंट कुठे आयोजित करण्यात आला आहे?
यशोभुमी, दिल्ली

IMC 2025 ची थीम काय आहे?
इनोवेट टु ट्रांसफॉर्म

Web Title: India mobile congress 2025 organized in yashobhoomi prime minister narendra modi inaugurate the event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स

PM Modi’s visit to Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद; फेरीसेवा ठप्प राहणार
2

PM Modi’s visit to Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद; फेरीसेवा ठप्प राहणार

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, ‘या’ कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड
3

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, ‘या’ कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा
4

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.