Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Instagram Follower : सोशल मीडिया किंग! पंतप्रधान मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते

PM Modi Instagram Follower : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून एक नवा विक्रम रचला आहे. एवढी फॉलोवर्सची संख्या असणारे जगातील पहिले राजकीय नेते बनले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2026 | 11:34 AM
PM Narendra Modi 100 million Instagram followers becomes first world leader

PM Narendra Modi 100 million Instagram followers becomes first world leader

Follow Us
Follow Us:
  • PM मोदींनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार
  • ठरले जगातील पहिले एकमेव नेते
  • सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा दबदबा
PM Modi Instagram Follower : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केवळ आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. पंतप्रधान मोदींचे संपूर्ण विश्वात चाहते आहेत. त्यांची विचारधारा आणि दृष्टीकोन याला पाठबळ देणारे करोडो लोक पंतप्रधान मोदींच्या मागे ठामपणे उभे आहेत. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर देखील आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून एक नवा विक्रम रचला आहे. एवढी फॉलोवर्सची संख्या असणारे जगातील पहिले राजकीय नेते बनले आहेत.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाढता दबदबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार स्वीकारल्यानंतर 2014मध्ये इंस्टाग्राम वापरण्यास सुरुवात केली. मागील 12 वर्षांपासून ते सोशल मीडियावर असून अनेक दिग्गज नेते, लोकप्रिय व्यक्ती, खेळाडू हे मोदींना फॉलो करत आहेत. जागतिक नेत्यांमध्ये सध्या ते सर्वात सक्रिय आणि सर्वाधिक फॉलोअर्स असलेले बनले आहेत. त्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वापर सातत्याने वाढत आहे, यामधून भारत आणि परदेशातील लोकांशी जोडण्याच्या त्यांच्या धोरणाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते.

हे देखील वाचा : ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

जागतिक नेत्यांमध्ये एक नेता

इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ४.३२ कोटी फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे १.५ कोटी फॉलोअर्स, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांचे १.४ कोटी, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे १.१६ कोटी आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांचे ६.४ कोटी फॉलोअर्स आहेत.

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मजबूत पकड

पंतप्रधान मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर १०.६ कोटी फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर त्यांचे ५.४ कोटी फॉलोअर्स आहेत. हे आकडे त्यांची विस्तृत जागतिक पोहोच आणि मजबूत जनसंपर्क दाखवून देत आहे. त्याचबरोबर ट्वीटरवर 10.62 कोटी फॉलोवर्स आहेत.

हे देखील वाचा : केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

देशातील जवळपास सर्वच खासदार, आमदार आणि लोकप्रिय नेते हे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहे. कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले आहे. या माध्यमातून आपला नेता रोज कुठे आहे. कोणाची भेट घेत आहे आणि काय विकासकाम करत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे लोकांचा आणि नेत्यांचा संपर्क देखील एकप्रकारे वाढतो. त्याचबरोबर प्रचारासाठी देखील सोशल मीडियाचा वापर जोरदार वाढला आहे. पंतप्रधान मोदी हे इंस्टाग्रामवर इतर भारतीय नेत्यांपेक्षा खूपच जास्त आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांचे फॉलोअर्स अंदाजे १.६१ कोटी आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फॉलोअर्स अंदाजे १.२६ कोटी कोटी आहेत.

Web Title: Pm narendra modi 100 million instagram followers becomes first world leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Instagram followers
  • PM Narendra Modi
  • Social Media

संबंधित बातम्या

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
1

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
2

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?
3

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?
4

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.