
भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone
सहसा सप्टेंबर महिन्यात कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करते. त्यामुळे आयफोनची निर्यात या महिन्यात कमी असते. मात्र यावेळी कंपनीने हा रेकॉर्ड तुटला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने 490 मिलियन डॉलरचे आयफोन एक्सपोर्ट केले होते. मात्र यावेळी हा आकडा थेट 1.2 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीने भारतात दोन नवीन प्लांट सुरू केले. यावर्षी एप्रिल महिन्यात अॅपलचे सप्लायर टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा होसुर आणि फॉक्सकॉनचा बंगळुरु प्लँट सुरु झाला होता. आता सर्व मिळून भारतात आयफोन तयार करणाऱ्या एकूण 5 फॅक्ट्र्या झाल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, अॅपलचे प्रोडक्शन आणि निर्यात गेल्या वर्षींच्या आकड्यांना पार करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टेरिफ प्लॅनमुळे काही आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात तयार करण्यात आलेले सर्वात जास्त आयफोन अमेरिकेत निर्यात केले जातात. यावर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारतात तयार करण्यात आलेले 8.43 बिलियन डॉलर किंमतीचे आयफोन निर्यात करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 2.88 बिलियन डॉलर किंमतीच्या स्मार्टफोनची निर्यात करण्यात आली होती. अॅपल आणि सॅमसंग हे अमेरिकेत मेड इन इंडिया फोनचे दुसरे सर्वात मोठे निर्यातदार आहेत.
अॅपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन सिरीज लाँच करत असते. या सिरीजमध्ये बेस मॉडेल, प्रो मॉडेल आणि प्रो मॅक्स मॉडेलसह आणखी एका मॉडेलचा समावेश केला जातो. भारतात आयफोनच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका अहवालानुसार, भारतात 80 टक्क्यांहून अधिक आयफोन ईएमआयवर खरेदी केले जातात.