iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश
जर तुम्ही चांगल्या कॅमेऱ्यासाठी iPhone 17 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. तुम्हाला चांगली कॅमेरा क्वालिटी पाहिजे असेल पण Apple च्या बंधनाच अडकायचं नसेल तर 2025 मध्ये टेक कंपन्या तुमच्यासाठी काही चांगले ऑप्शन्स घेऊन आल्या आहेत. याच काही ऑप्शन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हा स्मार्टफोन कंपनीने 1,09,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये Google ने त्यांचे AI आणि computational photography ची ताकद दिली आहे. या फोनमध्ये 50MP चा मुख्य सेंसर, 48MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (5x ऑप्टिकल झूम) आणि 48MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे, जो 8K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 42MP चा अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगमध्ये देखील उत्तम आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचे नेचुरल कलर रिप्रोडक्शन आणि नाइट मोड लो-लाइटमध्ये देखील उत्तम डिटेल्स देतात.
या स्मार्टफोनची किंमत 76,000 रुपये आहे. Oppo च्या Find X8 Ultra फोनमध्ये चार 50MP चे सेंसर देण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक 3x आणि दूसरा 6x सह दोन पेरिस्कोप लेंस आहेत. याचा 1-इंच वाइड सेंसर अधिक डिटेल्ड आणि प्रोफेशनल-लेवल फोटोग्राफी ऑफर करतो. Hasselblad कलर ट्यूनिंग आणि Dolby Vision 10-बिट व्हिडीओ रिकॉर्डिंग फीचरमुळे हा फोटोग्राफीसाठी एक चांगला पर्याय बनतो.
या स्मार्टफोनची किंमत 98,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या बाबतीत कोणत्याही मिनी डीएसएलआरपेक्षा कमी नाही. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी सेंसर, 50MP चा पेरिस्कोप लेंस (5x झूम), 10MP चा टेलीफोटो (3x झूम) आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8K व्हिडीओ रिकॉर्डिंग, HDR10+ आणि ProRAW सपोर्टसह येतो. डिटेलिंग, डायनामिक रेंज आणि कलर डेप्थच्या बाबतीत हा फोन iPhone 17 Pro पेक्षा अधिक चांगला आहे. विशेषतः झूम फोटोग्राफी आणि मून मोडमध्ये, हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली कॅमेरा फोन असल्याचे सिद्ध झाले आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन 94,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. कंपनी त्यांच्या X-सीरीजमधील स्मार्टफोन्समध्ये नेहमी कॅमेऱ्यावर फोकस करते. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 200MP चा टेलीफोटो लेंस आणि 50MP चा अल्ट्रावाइड सेंसर देण्यात आला आहे. Zeiss ऑप्टिक्स आणि 8K व्हिडीओ सपोर्ट देखील या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. त्याची इमेज क्वालिटी, ज्यामध्ये रंग अचूकता, बोकेह इफेक्ट्स आणि डीटेल्सची पातळी यांचा समावेश आहे, खरोखरच एक व्यावसायिक कॅमेरा अनुभव देते. अनेक एक्सपर्ट रिव्यूमध्ये त्याला iPhone 17 Pro चा सर्वात मोठा कॅमेरा प्रतिस्पर्धी म्हटले आहे.