AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. भारतात AI मुळे पैशांचा पाऊस पडणार आहे, असं वक्तव्य इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे. दिवसेंदिवस AI क्षेत्रात मोठी प्रगती केली जात आहे. आपल्या सोयीसाठी आणि आपली कामं अधिक सोपी व्हावी यासाठी आपण AI चा वापर करत आहोत. अनेक टेक कंपन्या देखील त्यांच्या AI मॉडेलमध्ये प्रगती करत असून नवनवीन फीचर्स लाँच केले जात आहेत.
हेदेखील वाचा- OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम
AI चॅटबॉट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. AI ची हीच प्रगती लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. AI मुळे भारतात पैशांचा पाऊस पडणार आहे. शिवाय भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता राजीव चंद्रशेखर यांनी वर्तवली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. India AI मिशनचे मूल्य देखील 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपयांपर्यंत दुप्पट होईल.
केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणतात की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था फक्त 2026-27 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल अशी सरकारची अपेक्षा होती. परंतु, कोविड-19 साथीच्या आजारासारख्या अनपेक्षित आव्हानांमुळे, लक्ष्य एका वर्षाने वाढले आहे.
हेदेखील वाचा- गुगलने लाँच केले AI पॉवर्ड समरी कार्ड, Gmail वापरकर्त्यांना मिळणार फायदा, काम होणार अधिक सोपे
केंद्रीय मंत्री एका निवेदनात म्हणाले होते, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटलायझेशनवर खूप लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळेच डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के दराने वाढत आहे. आम्ही आधीच जगातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था आहोत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर यांनी हे वक्तव्य केले होते. या कार्यक्रमाला सुमारे 300 आयटी, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, AI ला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी आधीच 1 लाख कोटी रुपयांचा सीड फंड मंजूर केला आहे. यामुळे डिजिटल क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना मिळेल. उदाहरणार्थ, एखाद्याने एखादे तंत्रज्ञान तयार केले असेल, तर त्याच्या संशोधन आणि विकासासाठी India AI मिशनचा वापर केला जाईल. त्याची एकूण किंमत 20,000 कोटी रुपये असेल.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आमच्या सरकारचे उद्दिष्ट तरुण भारतीयांना प्रगत करणे आहे. जेणेकरून ते जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. ते म्हणाले की तंत्रज्ञान उद्योगाला विकासाचा हा वेग कायम ठेवायचा आहे आणि आमचे लक्ष देखील या गोष्टीवर आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये डिजिटल इंडिया मिशन सुरू केले होते. या अंतर्गत प्रत्येक भारतीयाकडे इंटरनेट कनेक्शन असेल आणि ते पूर्णपणे डिजिटली सक्षम होतील.