Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकार करणार DeepSeek चा पर्दापाश! सुरु झाली चौकशी, लवकरच जगासमोर येणार चीनी AI चं काळ सत्य

डीपसीकचा वापर चॅटजीपीटी सारखा करता येणार नाही. आपण सतर्क राहिले पाहिजे, अशी चिंता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांच्या डेटाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2025 | 07:45 PM
मोदी सरकार करणार DeepSeek चा पर्दापाश! सुरु झाली चौकशी, लवकरच जगासमोर येणार चीनी AI चं काळ सत्य

मोदी सरकार करणार DeepSeek चा पर्दापाश! सुरु झाली चौकशी, लवकरच जगासमोर येणार चीनी AI चं काळ सत्य

Follow Us
Close
Follow Us:

भारत सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना एआय चॅटबोट डीपसिक आणि चॅटजीपीटाचा वापर करण्यास मनाई केली आहे. आता सरकार अधिकृतपणे डिपसिकवर बंदी घालू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारत सरकार लवकरच चिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल डीपसीकबाबत अधिकृत इशारा जारी जारी करू शकते, ज्यामुळे भारतात डीपसिकच्या वापरावर बंदी घातली जाऊ शकते.

जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍सवर इंडियन गेम्सची एंट्री! MIB, IEIC आणि WinZO ने लाँच केलं टेक ट्रायम्‍फ सीझन 3

नुकताच सादर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान डिपसिकबाबत कोणतीही चुकीची माहिती समोर आली तर डीपसिक भारतात बॅन केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सखोल तपास सुरू

अहवालात म्हटले आहे की CERT-In DeepSeek सारखी GenAI साधने भारतीय नागरिकांसाठी कशी धोकादायक ठरू शकतात याचा सखोल तपास करत आहे. तपासादरम्यान, हे देखील आढळून आले आहे की हे एआय टूल वापरकर्त्यांचे वर्तन, त्यांचा डिव्हाइस डेटा आणि टाइप करताना कीस्ट्रोक (कीबोर्ड दाबण्याचे नमुने) देखील ट्रॅक करू शकते.

डीपसीक एआय बद्दल सरकारची चिंता

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने या विषयावर चिंता व्यक्त केली आणि म्हटले की ‘डीपसीकचा वापर चॅटजीपीटी सारखा करता येणार नाही. आपण सतर्क राहिले पाहिजे. सरकार लवकरच एक अधिकृत सल्लागार जारी करू शकते, ज्यामध्ये या एआय टूलचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्या जातील. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला चीनने आपल्या नागरिकांच्या डेटामध्ये प्रवेश करणं सोयीस्कर वाटत नाही कारण संवेदनशील डेटा कुठे आणि कसा साठवला जातो हे स्पष्ट नाही. त्यामुळे भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांच्या डेटाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

डीपसीक एआय डेटा कसा गोळा करते?

तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मते, हे अ‍ॅप तीन प्रकारचे डेटा गोळा करते –

यूजर प्रॉम्प्ट्स – यामध्ये चॅट इतिहास, कागदपत्रे आणि इमेजेचा समावेश असू शकतो.

ऑटोमेटिकली कलेक्टेड इंफॉर्मेशन – यामध्ये डिव्हाइस डेटा, इतर अ‍ॅप्समधील मेटाडेटा माहिती आणि कुकी ट्रॅकिंग समाविष्ट आहे.

इतर सोर्सकडून मिळालेली माहिती – यामध्ये सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेला डेटा आणि क्राउडसोर्स केलेला डेटा समाविष्ट असू शकतो. अहवालानुसार, हे एआय टूल किती वापरकर्त्यांनी चॅटजीपीटी अनइंस्टॉल केले आहे किंवा ते गुगल जेमिनी अ‍ॅपवर किती वेळ घालवत आहेत हे देखील ट्रॅक करू शकते.

डीपसीक एआय द्वारे चुकीची माहिती पसरवण्याचा धोका

या तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की, ‘सर्वात मोठी चिंता ही आहे की हे एआय चॅटबॉट राजकीय चर्चा प्रभावित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवू शकते.’ ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर इतर अनेक देशांनीही डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे.

Vivo Smartphone: Vivo चा तगडा स्मार्टफोन लवकरच भारतात करणार एंट्री, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

इतर देशांकडून प्रतिक्रिया

डीपसीकबद्दल जागतिक चिंता देखील वाढत आहेत. इटली, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील संघीय संस्थांनी त्यांच्या सरकारी उपकरणांमध्ये या एआय टूलच्या वापरावर आधीच बंदी घातली आहे. गेल्या महिन्यात, भारताच्या अर्थ मंत्रालयाने सरकारी संगणक आणि उपकरणांवर एआय टूल्स (जसे की चॅटजीपीटी, डीपसीक) वापरण्यात सुरक्षा धोके असल्याचे नमूद करून अंतर्गत सल्लागार जारी केला. या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असे लिहिले होते की ‘एआय टूल्स गोपनीय सरकारी डेटा आणि कागदपत्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात.’

Web Title: Indian government will start inquiry about china ai app deepseek tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.