OMG! डिजिटल डिस्प्लेसह लाँच झाली भारतातील पहिली Smart Ring, हार्ट रेट करते मॉनिटर; केवळ इतकी आहे किंमत
Pebble Halo स्मार्ट रिंग भारतात लाँच करण्यात आली आहे. ही रिंग 6 साईज आणि तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे. ही भारतातील पहिली अशी स्मार्ट रिंग आहे ज्यामध्ये इन-बिल्ट डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्ट वियरेबल हेल्थ आणि वेलनेस फीचर्सने सुसज्ज आहे, ज्यामध्ये सेंसर बसवण्यात आला आहे, जो हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल, स्लीप सायकल आणि स्ट्रेस लेवल्स मॉनिटर करतो. Pebble Halo स्मार्ट रिंग वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते आणि असा दावा केला जातो की हे डिव्हाईस सिंगल चार्जवर 4 दिवसांपर्यंत चालू शकते. Pebble Halo स्मार्ट रिंग या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या डिव्हाईसचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Pebble Halo स्मार्ट रिंगची किंमत 7,999 रुपये आहे आणि सध्या ऑफिशिअसल वेबसाईटवर हि रिंग 3,999 रुपयांना प्री-ऑर्डर्ससाठी उपलब्ध आहे. हि रिंग Flipkart वर 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. रिंग ब्लॅक, गोल्ड आणि सिल्वर फिनिश ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Pebble Halo स्मार्ट रिंग 6 आकारात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या रिंगची साईज 7 ते 12 पर्यंत आहे. साइज 7 व्हेरिअंटचा डायमीटर 53–55mm आहे, तर साइज 12 व्हेरिअंटचा डायमीटर 67–70mm आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील डिझाईन आहे आणि याला स्किन-फ्रेंडली मटेरियल्सद्वारे तयार करण्यात आले आहे. हे एक इन-बिल्ट डिजिटल डिस्प्लेने सुसज्ज आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, रिंग वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहे, अ द्याप कोणतेही सर्टिफिकेशन डिटेल्स शेअर करण्यात आले नाहीत.
Pebble ची Halo रिंग अनेक हेल्थ आणि वेलनेस फीचर्सला सपोर्ट करतो. हे हार्ट रेट, स्लीप, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्ट्रेस, आणि हार्ट रेट वेरिएबिलिटी (HRV) ट्रॅकर्सने सुसज्ज आहे. रिंग स्टेप आणि कॅलरी काउंटर्स देखील ऑफर करते. ऑनलाइन वीडियोज स्क्रॉल करण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी आणि ई-बुक्स किंवा दूसरी डॉक्यूमेंट्स वाचण्यासाठी पेज फ्लिप करण्यासाठी हे गेस्चर कंट्रोल्स सपोर्ट देखील करते. यूजर्स पेयर्ड हँडसेटवर कॅमेरा शटर आणि संगीत प्लेबॅक देखील नियंत्रित करू शकतात.
Pebble Halo स्मार्ट रिंग एकदा चार्ज केल्यावर चार दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जातो. ही रिंग 120 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते असा दावा केला जातो. ती वायरलेस चार्जिंग आणि ब्लूटूथ 5.2 कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करते. ती iOS आणि अँड्रॉइड डिव्हाइसेस आणि पेबल हॅलो अॅपशी सुसंगत आहे.