
Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक
कंपनीने या नवीन फीचरबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स आता रिल्स सेक्शनमध्ये जाऊन त्यांच्या आवडीचा कंटेट सेट करू शकणार आहेत. एल्गोरिदम ‘Brick by Brick’ म्हणजेच हळूहळू तुमच्या हिशोबाने सेट करू शकणार आहात. एवढंच नाही तर कंपनीचं असं म्हणणं आहे की, या नवीन फीचरद्वारे यूजर्स सेट करू शकणार आहेत की त्यांना कोणत्या पद्धतीचे व्हिडीओ पाहणं जास्त पसंत असेल आणि कोणत्या कंटेटपासून यूजर्सना दूर राहायचं आहे. यामुळे रील्स फीड पूर्वीपेक्षा अधिक पर्सनल आणि यूजर-फ्रेंडली होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Building your Instagram algorithm “brick by brick” just got easier. Just go to your Reels tab and tap on the top right corner to find your algorithm. There you can modify your interests to make your algo your own. ✨ (Available to English-speaking users in most countries.) pic.twitter.com/Yzk5aYIjom — Instagram (@instagram) January 13, 2026
इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना रिल्स टॅबमध्ये जावे लागणार आहे आणि तिथे तुम्हाला वर उजवीकडे दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर यूवर अल्गोरिदमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या आवडीच्या हिशोबाने ऑप्शन सेट करावे लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणता कंटेट पाहायला आवडेल, हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. या सेक्शनमध्ये तुम्ही स्पोर्ट्स, फिटनेस, क्रिएटिविटी, म्यूजिक, स्टडी, ट्रॅवल सारखे पर्याय निवडू शकता, ज्यामुळे अल्गोरिदम एकाच प्रकारचा कंटेंट अधिक दाखवेल.
कंपनीने सोशस मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत या नवीन फीचरची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, सध्या, बहुतेक देशांमध्ये इंग्रजी भाषिक यूजर्स हे फीचर वापरू शकतात. भविष्यात कंपनीचं हे नवीन फीचर इतर भाषांमध्ये आणि देशांमध्ये आणले जाऊ शकते. येत्या काही आठवड्यात लवकरच हे अपडेट सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.
Ans: Instagram हे Meta (पूर्वी Facebook) या कंपनीचे अॅप आहे.
Ans: होय, Instagram वापरणे पूर्णपणे मोफत आहे.
Ans: Reels, ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सर्ड पोस्ट, अॅफिलिएट मार्केटिंग आणि क्रिएटर टूल्सद्वारे कमाई करता येते.