गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक
बुलेट 350 आणि स्पोर्टी कॉन्टिनेंटल जीटी 650 पहिल्यांदाच बीजीएमआयच्या वर्चुअल जगात देखील राइडेबल मोटरसायकल म्हणून सादर केली जाणार आहे. या दोन्ही मोटारसायकल गेममध्ये बीजीएमआयच्या 4.2 अपडेट नंतर पाहायला मिळणार आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी नवीन अपडेट लाईव्ह होणार आहे. तथापि, प्लेयर्स 19 जानेवारी 2026 पासून गेममध्ये या बाईक चालवू शकतील. नवीन अपडेट आणि कंपन्यांनी केलेल्या पार्टनरशिपमुळे ऑनलाईन गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपन्यांनी केलेल्या या पार्टनरशिपचा फायदा म्हणजेच मोबाईल गेमिंग आणि मोटरसाइकिलिंगमधील भारतातील दोन यूथ कल्चर एकत्र काम करणार आहेत. प्लेअर्स आता वर्चुअल बॅटलफील्डवर रॉयल एनफिल्डच्या दमदार बाईक्स चालवण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. तसेच बाईक लवर्सना त्यांच्या आवडत्या बाईकची झलक देशातील सर्वात मोठ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या बाईक केवळ रस्त्यावर धावत होत्या, त्या आता गेममध्ये देखील दिसणार आहेत.
एवढंच नाही या पार्टरनशिप अंतर्गत रॉयल एनफिल्डने कॉन्टिनेन्टल GT 650 वर बेस्ड एक कस्टम-बिल्ट बाईक देखील लाईव्ह ईव्हेंट दरम्यान सादर केली जाणार आहे. जे BGMI च्या टॅक्टिकल आणि वॉर-रेडी लुकपासून अत्यंत प्रेरित असणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला पिकाटिनी रेल्स, आर्मर्ड प्लेटिंग, पॅराशूट टाई-डाउन पॉइंट्स आणि बॅलून टायर्स सारखे एलिमेंट्स देखील पाहायला मिळणार आहे. जे थेट BGMI च्या कॉम्बॅट आणि सर्वाइवल मेकेनिक्ससोबत जोडलेले असणार आहेत. या बाईक्स डिजिटल आणि रियल वर्ल्ड यांच्यामधील अंतर कमी करण्याचे काम करणार आहे.
रॉयल एनफिल्डसंबंधित खास इन-गेम कंटेंट 19 जानेवारीपासून 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. यामध्ये स्पेशल SPIN फॉर्मेटद्वारे प्लेअर्स अनेक प्रीमियम रिवॉर्ड जिंकू शकणार आहेत. ज्यामध्ये मिथिक (रेड टियर) रेव्हल 01 सेट, बुलेट लाइन – पी90 गन स्किन, क्रँकगार्ड हेल्मेट, रोडबॉर्न रक्सॅक बॅकपॅक आणि रॉयल एनफील्ड बुलेट 350 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 देखील समाविष्ट असणार आहे.
Ans: BGMI हा गेम KRAFTON या कंपनीने विकसित केला आहे.
Ans: BGMI हा भारतासाठी तयार करण्यात आलेला PUBG चा भारतीय व्हर्जन आहे, ज्यामध्ये भारतीय नियम आणि सुरक्षा धोरणांचा विचार करण्यात आला आहे.
Ans: होय, BGMI Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.






