
Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करण्याची तयारी केली आहे. हे फीचर युजर्ससाठी अतिशय फायदेशीर आणि मजेदार असणार आहे. इंस्टाग्राम या नवीन फीचरअंतर्गत त्यांच्या युजर्सना एल्गोरिद्म बेस्ड रिकमेंडेशन आणि जास्त पर्सनलाइज करण्याचं ऑप्शन देणार आहे. यामध्ये युजर्स त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकता किंवा काढून टाकू शकता.
सुरुवात रिल्सने होणार आहे आणि नंतर हे फीचर Explore पेजसाठी देखील सुरु केलं जाणार आहे. या अपडेटबाबत इंस्टाग्राम चीफ Adam Mosseri ने Threads वर घोषणा केली आहे. याचा उद्देष यूजर्सना त्यांची फीड आणि ब्राउजिंग एक्सपीरिएंसवर जास्त कंट्रोल मिळावा, असा आहे. हे पाऊल Meta च्या मोठ्या प्लॅनचा भाग आहे, ज्यामध्ये अॅप्स कस्टमाइजेशन आणि ट्रांसपेरेंसी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अलीकडेच सेंसिटिव कंटेंट कंट्रोल आणि सजेस्टेड पोस्टला रिफाइन करण्याचे फीचर्स देखील अॅपमध्ये जोडण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
‘आज आम्ही तुमच्या आवडीनुसार विषय जोडून इंस्टाग्रामवर तुमचा अल्गोरिथम ट्यून करण्याचा एक मार्ग तपासण्यास सुरुवात करत आहोत. आम्ही हे वैशिष्ट्य प्रथम रील्सवर लाँच करत आहोत, लवकरच एक्सप्लोरमध्ये विस्तारित करण्याची योजना आहे. थ्रेड्सवर याचे वर्जन कसे दिसेल हे देखील आम्ही एक्सप्लोर करत आहोत.’
Instagram CEO Adam Mosseri ना सांगितलं आहे की, कंपनी एका अशा फीचरची चाचणी करत आहे, ज्यामुळे युजर्स त्यांचं ‘एल्गोरिदम ट्यून’ करू शकणार आहेत. हे अपडेट यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे कारण, लोक त्यांच्या फीडमध्ये दिसणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण ठेवू शकतात, ज्यामुळे ब्राउझिंग अनुभव अधिक वैयक्तिक बनतो. हे फीचर ‘Your Algorithm’ नावाच्या नवीन सेक्शनमध्ये सेटिंगमध्ये युजर्सना मिळणार आहे. जिथे यूजर्स त्यांचे रिकमेंडेशन्स इन्फ्लूएंस करणारे विषय पाहू शकतील आणि मॅनेज करू शकतील. हे तुमच्या इंटरॅक्शन पॅटर्नचा सारांश देते, जसे मोसेरीच्या उदाहरणात लक्झरी घड्याळे, फॅशन वीक, बॅड बनी, स्टँड-अप कॉमेडी आणि कॉन्सर्ट यासारखे विषय दाखवले गेले.
यूजर्स Add+ बटणवर क्लिक करून नवीन आवडते टॉपिक्स निवडू शकतात, किंवा तुम्ही अशा विषयांवरील कमी कंटेंट पाहण्याचा पर्याय निवडू शकता. युजर्सच्या अकाऊंटमध्ये प्रवेश सक्रिय झाल्यानंतरच हे वैशिष्ट्य वापरले जाऊ शकते. सुरुवातीला हे एल्गोरिदम कस्टमाइजेशन केवळ रिल्ससाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच युजर्स त्यांच्या रिल्स फीडला फाइन-ट्यून करू शकणार आहेत. हे अपडेट Instagram ने यूजर्सना अधिक नियंत्रण देण्यासाठी एक प्रमुख प्रयत्न आहे, ज्यामध्ये पॅरेंटल टूल्स, सेंसिटिव कंटेंट लिमिट आणि चांगले फिल्टरिंग यासारख्या आधीच सादर केलेल्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट करण्याची प्रोसेस काय आहे?
सेटिंग्जमध्ये जाऊन “Privacy” पर्याय निवडा आणि “Private Account” ऑन करा
इंस्टाग्रामवर रील्सवर व्ह्यूज वाढवण्याची सोपी पद्धत कोणती?
ट्रेंडिंग ऑडिओ आणि योग्य हॅशटॅगचा वापर, सातत्याने पोस्ट करणं
इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता हाईड कशी करावी?
Archive पर्यायाची निवड करावी.