OpenAI च्या ChatGPT Atlas AI ब्राऊझरचे टॉप फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण, क्रोमला टक्कर देण्यासाठी झाले सज्ज
अमेरिकी कंपनी OpenAI ने त्यांचे नवीन ChatGPT Atlas ब्राउझर लाँच केले आहे. ChatGPT वर आधारित असलेले हे AI पावर्ड ब्राउझर गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कंपनीने लाँच केलेले हे नवीन ब्राउझर केवळ मॅक OS साठी उपलब्ध आहे आणि येणाऱ्या काळात हे ब्राऊझर विंडोज, iOS आणि अँड्रॉईडसाठी देखील लाँच केले जाणार आहे. OpenAI च्या या ब्राउझरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे क्रोमसाठी एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं.
AI कंपनी OpenAI चे नवीन ChatGPT Atlas Browser थेट Google Chrome, Gemini आणि Perplexity Comet Browser ला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या ब्राउझरनंतर टेक विश्वात एक नवीन स्पर्धा सुरु झाली आहे. या नव्या ब्राउझरचे काही खास फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ChatGPT Atlas मध्ये एक AI-साइडबार देण्यात आला आहे, जे तुम्ही कोणत्याही वेबपेजवर ओपन करू शकता. हे ब्राउझर तुम्हाला त्या रियल टाइममध्ये पेजची माहिती किंवा सारांश देण्यासाठी, प्रोडक्ट्सची तुलना करण्यासाठी किंवा डेटा एनालिसिस करण्यासाठी मदत करणार आहे.
OpenAI ने Atlas मध्ये एक स्मार्ट मेमोरी सिस्टम जोडले आहे. यूजर ठरवू शकतात की, ChatGPT काय लक्षात ठेवणार आहे. यामुळे ChatGPT भविष्यात महत्त्वाची माहिती लक्षात ठेऊन त्यांसंबंधित तुम्हाला पर्सनलाइज्ड उत्तर देऊ शकणार आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा कंटेट काही सेकंदात शोधू शकणार आहात.
Atlas Browser मध्ये आता ChatGPT केवळ उत्तर देण्यापुरतं मर्यादित नाही. हे AI एजेंट्सना एक्टिव करू शकते. हे तुमच्याऐवजी सर्व काम स्वत: करू शकणार आहेत, जसे ट्रिपसाठी रिसर्च करणं, टिकट बुक करणं, किंवा ऑनलाइन शॉपिंगमध्ये आइटम कार्टमध्ये जोडणे.
Atlas मध्ये एक असं टूल देखील देण्यात आले आहे, जे तुमच्या ईमेल, नोट्स किंवा डॉक्सना ऑटो-पॉलिश करते. तुम्हाला केवळ हा टेक्स्ट हायलाइट करावा लागणार आहे आणि ChatGPT मधून एक क्लिकची मदत घ्यावी लागणार आहे. हे टूल तुमची भाषा अगदी प्रोफेशनल टोनमध्ये कन्वर्ट करणार आहे.
Atlas मध्ये ChatGPT चे नवीन सर्च इंजन वर्जन समाविष्ट करण्यात आले आहे, जे आता केवळ टेक्स्ट नाही तक इमेज, व्हिडीओ आणि न्यूज कंटेंटमधून माहिती गोळा करून उत्तरे देखील देऊ शकणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला प्रत्येक फॉर्मेटमध्ये उत्तर मिळणार आहे.
Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
OpenAI ने ChatGPT Atlas मध्ये मजबूत प्रायव्हसी कंट्रोल्स दिले आहेत. आता युजर्स ठरवू शकार आहेत की ChatGPT कोणत्या वेबसाईट एक्सेस करू शकणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कधीही ब्राउझिंग इतिहास क्लियर करू शकता, इनकॉग्निटो मोडमध्ये ब्राउझ करू शकता किंवा ब्राउझर मेमरी व्यवस्थापित करू शकता.






