 
        
        Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!
एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस कंपनी स्टारलिंक भारतात लवकरच त्यांची सेवा सुरु करणार आहे. यासाठी कंपनीने प्रयत्न देखील सुरु केले आहेत. भारतीय सरकारच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून मस्कला भारतात त्यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करावी लागणार आहे. भारतातील स्टारलिंकच्या लाँचिंगबाबत सतत अपडेट्स येत असतात. आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. हे अपडेट युजर्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारतात कंपनीने 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन दिवशी स्टारलिंकच्या डेमोचे आयोजन केले आहे. मुंबई शहरात हे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात स्टारलिंकने पहिलं पाऊल ठेवलं आहे. कंपनीने सॅटेलाईट इंटरनेटचा डेमो देखील आयोजित केला आहे. भारतात नवीन सेवा सुरु करण्यासाठी हा पहिला मोठा प्रयत्न आहे. डेमोसाठी कंपनीने मुंबईतील अंधेरी ईस्टमध्ये 1294 स्क्वेअर फुटचे ऑफिस घेतले आहे. या ऑफीसमधून पुढीस 5 वर्षे कंपनी त्यांचं काम करणार आहे. यासोबतच कंपनी मुंबईत एकच ट्रायल करत आहे, ज्यामध्ये स्टारलिंकच्या टेक्नॉलजीद्वारे सामान्य माणसांना आणि व्हिआपी लोकांना ही सेवा कशी पुरवली जाणार आहे, याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्टनुसार, कंपनी मुंबईला त्यांचं हब बनवून संपूर्ण देश ऑपरेट करण्याची तयारी करत आहे. स्टारलिंक भारतातील 9 शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे, ज्यामध्ये मुंबईचा देखील समावेश आहे. डेमोदरम्यान कंपनी प्रोविजनल स्पेक्ट्रमचा वापर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे स्पेक्ट्रम कंपनीला तात्पुरते वापरण्यासाठी देण्यात आला आहे. सरकारी तपास संस्था आयोजित करण्यात आलेल्या या डेमोवर नजर ठेवणार आहे. हा डेमो स्टारलिंकची भारतात सर्विस सुरु करण्यासाठी रेगुलेटरी क्लियरेंसचे मोठे पाऊल आहे.
स्टारलिंकच्या डेमोदरम्यान, पोलीस आणि सायबर सिक्योरिटी सारख्या सरकारी संथ्या याच्या डेटा एनक्रिप्शन, यूजर ट्रॅकिंग आणि दूसऱ्या सुरक्षा तपासणीची तीव्रतेची चाचणी करणार आहे. यासोबतच स्टारलिंकचे कनेक्शन स्टेबिलिटी, इंटरनेट स्पीड, लेटेंसी आणि कनेक्टिविटीची देखील चाचणी केली जाणार आहे.
एलन मस्कच्या कंपनीने दावा केला आहे, भारताच्या दुर्गम भागात इंटरनेटचा वापर सुलभ होणार आहे. सॅटेलाईट इंटरनेट अशा भागांत हाय स्पीड इंटरनेट सर्विस ऑफर करणार आहे, जिथे आतापर्यंत कोणतेही नेटवर्क पोहोचणं अशक्य होतं. इंटरनेटच्या आगमनामुळे दुर्गम भागातील लोकांना ऑनलाइन सेवा, टेलिमेडिसिन आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध होतील. शिवाय, भारतीय दूरसंचार बाजारपेठेत एका नवीन खेळाडूच्या प्रवेशामुळे स्वस्त इंटरनेट सुविधा मिळू शकते.
स्टारलिंक भारतातील किती शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे?
9 शहरांत
स्टारलिंकसाठी सर्वात महत्त्वाची अट कोणती?
कंपनीला गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत फक्त भारतीय नागरिकच सॅटेलाईट स्टेशन चालवतील
स्टारलिंकचा युजर्सना कोणता फायदा होणार?
हाय-स्पीड इंटरनेट मिळणार






