Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

Instants App: Instagram ने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे यूजर्सचा फोटो शेअरिंगचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. इंस्टाग्रामच्या या नव्या अ‍ॅपमुळे स्नॅपचॅटसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 15, 2026 | 03:10 PM
फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

Follow Us
Follow Us:
  • Instagram ने Snapchat ला टक्कर देण्यासाठी Instants अ‍ॅप लाँच केलं आहे.
  • या अ‍ॅपमध्ये फोटो 24 तासांनंतर आपोआप गायब होणार आहेत.
  • Instants मध्ये स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग ब्लॉक असणार आहे.
Instagram Instants App: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने Instants नावाचे एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. फोटो शेअरिंग अ‍ॅप स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी इंंस्टाग्राम नवीन अ‍ॅप घेऊन आला आहे. लवकरच हे अ‍ॅप जागतिक स्थरावर लाँच केलं जाणार आहे. मात्र त्यापूर्वी काही देशांमध्ये याची चाचणी केली जाणार आहे. स्नॅपचॅटप्रमाणेच या अ‍ॅपमध्ये देखील फोटो पाहिल्यानंतर गायब होणार आहेत. 24 तासानंतर यूजर्सना या फोटोंचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. हा नवा अ‍ॅप इंस्टाग्रामसोबतच स्टँडअलोन अ‍ॅप म्हणून देखील अ‍ॅक्सेस केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की, तुम्ही थेट इंस्टाग्राममधून इंस्टंट अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळवू शकता किंवा स्वतंत्रपणे इंस्टंट अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे… व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

कसं काम करतं नवं इंस्टंट अ‍ॅप?

तुम्ही हे अ‍ॅप थेट इंस्टाग्राममधून किंवा स्वतंत्रपणे अ‍ॅक्सेस करू शकता. हा अ‍ॅप थेट कॅमेऱ्यामध्ये ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही कोणताही फोटो तुमच्या क्लोज फ्रेंड्स किंवा फॉलोवर्ससोबत शेअर करू शकता. तसेचा या अ‍ॅपमध्ये काही मर्यादा देखील लावण्यात आल्या आहेत. इंस्टंट अ‍ॅपमध्ये क्लिक करण्यात आलेले फोटो एडीट केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय, यूजर्स यामध्ये गॅलरीमधील फोटो देखील अपलोड करू शकत नाहीत. या अ‍ॅपमध्ये फोटो क्लिक केल्यानंतर यूजर्सकडे केवळ कॅप्शन जोडण्याचा पर्याय असणार आहे. या अ‍ॅपमध्ये यूजर्सना इंस्टाग्रामवर पाहायला मिळणाऱ्या एडिटेड इमेजपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव मिळणार आहे. इन्स्टंट्समध्ये यूजर्स खऱ्या ईमेज शेअर करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Google Play Store) 

स्क्रीनशॉट ब्लॉक असणार

इंस्टंट अ‍ॅपद्वारे पाठवलेले फोटोज समोरील यूजर्सच्या इनबॉक्समध्ये दिसणार आहेत. फोटो रिसिव्ह झाल्यानंतर समोरील यूजरकडे ईमोजी आणि टेक्स्टने रिप्लाय करण्याचा आणि स्वत:चे इंस्टंट परत पाठवण्याचा पर्याय असणार आहे. इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, इंस्टंट अ‍ॅपद्वारे पाठवलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट काढला जाऊ शकत नाही. तसेच यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगचा पर्याय देखील मिळणार नाही. यूजर्सना इंस्टंटमध्ये पाठवलेले फोटो कँसल करून अन्डू करण्याचा पर्याय मिळणाकर आहे. जोपर्यंत समोरील यूजर तुम्ही पाठवलेला फोटो ओपन करत नाही तोपर्यंत तुम्ही कँसल किंवा अन्डू करू शकता.

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Snapchat समोर नवं आव्हान!

इंस्टंट लाँच करून इंस्टाग्राम फोटो शेअरिंग अ‍ॅप स्नॅपचॅटला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. स्नॅपचॅट, बीरियल आणि लॉकेट विजेट यांसारख्या अ‍ॅपच्या शर्यतीत आता इंस्टाग्राम देखील इंस्टंटसह उतरला आहे. मात्र इंस्टाग्रामने नव्या अ‍ॅपमध्ये काही बदल केले आहेत. उदाहरणार्थ, शेअर केलेले इन्स्टंट्स एका खाजगी आर्काइव्हमध्ये एका वर्षापर्यंत साठवून ठेवता येतात आणि नंतर स्टोरी रिकॅप म्हणून वापरता येतात. इंस्टाग्रामने किशोरवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी फॅमिली सेंटर कंट्रोल्स आणि शेअर केलेल्या स्क्रीन टाइमवर मर्यादा यांसारख्या प्रणालींचाही समावेश केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Instagram वर नवीन अकाउंट कसं तयार करायचं?

    Ans: मोबाईल नंबर किंवा ईमेलच्या मदतीने Instagram अ‍ॅपमध्ये साइन अप करून अकाउंट तयार करता येतं.

  • Que: Instagram वर फोटो आणि रील्स कसे पोस्ट करायचे?

    Ans: अ‍ॅपमधील ‘+’ आयकॉनवर क्लिक करून फोटो, व्हिडिओ किंवा रील्स अपलोड करता येतात.

  • Que: Instagram चे Instants अ‍ॅप काय आहे?

    Ans: Instants हे Instagram चे नवीन फोटो शेअरिंग अ‍ॅप आहे, ज्यामध्ये फोटो 24 तासांनंतर गायब होतात.

Web Title: Instagram launched new instants app it will compete with snapchat how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.