6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी Vivo ने आणखी एक दमदार 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y60 या नावाने लाँच केला आहे. अलीकडेच कंपनीने Vivo Y600 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या मॉडेलसह विवो इतर टेक कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने त्यांचे नवीन हँडसेट तीन रंग आणि तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये आहे. विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.
टेक कंपनीने नवीन हँडसेट 6GB + 128GB, 6GB + 256GB आणि 8GB + 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लकी पर्पल, ऑब्सिडियन ब्लॅक आणि शानहाइकिंग या तीन रंगांच्या पर्यायांंमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.74-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 16.7 मिलियन कलर आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे.
लेटेस्ट Vivo Y60 मध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. नवीन हँडसेट अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये, अॅड्रेनो 613 जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिले आहे.
अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर
यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला CMOS सेंसर, ऑटोफोकस आणि 10x पर्यंत डिजिटल झूमसह 13-मेगापिक्सेल (f/2.2) चा सिंगल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 5-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Vivo Y60 मध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Vivo ही चीनची स्मार्टफोन कंपनी आहे.
Ans: हो, Vivo विविध बजेट आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये 5G स्मार्टफोन लॉन्च करते.
Ans: हो, Vivo स्मार्टफोन विशेषतः कॅमेरा आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहेत.






