Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

Apple TV यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर देखील इंस्टाग्राम रिल्स पाहण्याचा आनंद मिळणार आहे. याबाबत मेटाने आता घोषणा देखील केली आहे. पण ॲपल टिव्हीमध्ये इंस्टाग्राम डाऊनलोड करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2026 | 09:11 AM
मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या स्क्रीनवर रिल्स पाहण्याचा आनंद
  • इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी उपलब्ध
  • मोठ्या स्क्रीनवर इंस्टाग्राम पाहण्यासाठी ॲपल टिव्हीमध्ये नवीन सॉफ्टवेयर वर्जन असणं गरजेचं
आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम केवळ छोट्या स्क्रीनपुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण आता मेटाने त्यांचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम Apple TV वर देखील उपलब्ध केले आहे. त्यामुळे आता यूजर्सना मोठ्या स्क्रीनवर देखील रिल्स पाहण्याचा आनंद मिळणार आहे. आता यूजर्स टिव्हीवर रिल्ससोबत इतर व्हिडीओ आणि लाईव्ह शो देखील पाहू शकणार आहेत. कंपनीने इंस्टाग्रामचा व्हिडीओ अनुभव स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन लिविंग रुमपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे मित्र आणि कुटूंब एकत्र येऊन इंस्टाग्रामवरील कंटेट पाहण्याचा अनुभव घेऊ शकतात.

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी देखील उपलब्ध

आता ॲप स्टोअरवर इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी देखील उपलब्ध करण्यात आले आहे. यापूर्वी इंस्टाग्राम ॲपच्या लिस्टिंगमध्ये केवळ आयफोन आणि आयपॅडसाठी सपोर्ट देण्यात आला होता. या लिस्टिंगमध्ये ॲपल टिव्हीचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता कंपनीने ॲपल टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲप जारी केले आहे. त्यामुळे आता यूजर्स ॲपल टिव्हीवर इंस्टाग्राम डाऊनलोड करून मोठ्या स्क्रीनवर रिल्स पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

यूजर्स हे ॲप मोफत डाऊनलोड करू शकतात. तसेच यामध्ये इन-ॲप खरेदीचा पर्याय देखील देण्यात आला आहे. लक्षात ठेवा की, मोठ्या स्क्रीनवर इंस्टाग्राम पाहण्यासाठी ॲपल टिव्हीमध्ये tvOS 26.0 किंवा नवीन सॉफ्टवेयर वर्जन असणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

इंस्टाग्राम रिल्स पाहण्याचा अनुभव बदलणार

टिव्हीवर इंस्टाग्रामचा अनुभव केवळ छोट्या व्हिडीओंपुरता मर्यादित राहणार नाही. तर यूजर्स त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सचे व्हिडीओ पाहू शकतात आणि त्यांच्या आवडीनुसार कंटेट शोधू शकणार आहेत. ॲपमध्ये रिल्सव्यतिरिक्त मोठे व्हिडीओ आणि लाईव्ह शो पाहण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. यामध्ये असे देखील एक फीचर आहे की, यूजर्स दुसऱ्या डिव्हाईसवर पाहत असलेला अपूर्ण व्हिडीओ देखील टिव्हीवर पाहू शकणार आहेत.

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मेटाचा प्रयत्न

मेटाने डिसेंबर 2025 मध्ये ॲमेझॉन फायर टीव्ही डिव्हाईसवर इंस्टाग्राम सपोर्ट ऑफर करत चाचणी सुरु केली होती. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये गूगल टिव्ही आणि जून 2026 मध्ये सॅमसंग स्मार्ट टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲपचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता कंपनीने ॲपल टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲप उपलब्ध केले आहे.

ॲपल टिव्हीसाठी इंस्टाग्राम ॲप उपलब्ध करत मेटाने त्यांचे व्हिडीओ प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर एकट्याने रिल्स पाहण्याऐवजी यूजर्सना टिव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर मित्र आणि कुटूंबासोबत रिल्स पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आता इंस्टाग्राम Reels थेट TV वर पाहता येणार आहेत का?

    Ans: होय, इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी उपलब्ध झाल्यामुळे यूजर्सना मोठ्या स्क्रीनवर Reels, व्हिडीओ आणि लाइव्ह शो पाहता येणार आहेत.

  • Que: ॲपल टिव्हीवर इंस्टाग्राम ॲप कसे डाउनलोड करायचे?

    Ans: ॲपल टिव्ही वरील App Store उघडा, इंस्टाग्राम ॲप शोधा आणि उपलब्ध असल्यास ते डाउनलोड करा.

  • Que: ॲपल टिव्ही वर इंस्टाग्राम वापरण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आवश्यक आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, ॲपल टिव्हीमध्ये tvOS 26.0 किंवा त्यापेक्षा नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन असणे आवश्यक आहे.

Web Title: Instagram reels now available on apple tv now users can watch videos on the big screen hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • apple
  • instagram
  • meta

संबंधित बातम्या

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स
1

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत
2

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज
3

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज

Apple iPhone Duo: अरे देवा! हे काय झालं? 3 लाखांचा फोल्डेबल iPhone स्क्रीनवर स्क्रॅच; बेंड करताच दिसल्या हिरव्या रेषा! Video Viral
4

Apple iPhone Duo: अरे देवा! हे काय झालं? 3 लाखांचा फोल्डेबल iPhone स्क्रीनवर स्क्रॅच; बेंड करताच दिसल्या हिरव्या रेषा! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.