
Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
डिस्काऊंटव्यतिरिक्त सेलमध्ये एलिजिबल बँक ऑफर्स, कूपन्स, कॅशबॅक आणि ईएमआय फायदे देखील मिळणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉन सेलमध्ये आयफोन 16 आणि आयफोन 17 ई या दोन्ही डिव्हाईसवर ऑफर्स मिळणार आहेत. सेलमध्ये दोन्ही डिव्हाईसच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
आयफोन 16 चे 128GB व्हेरिअंट आता ॲमेझॉनवर केवळ 76,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या आयफोन मॉडेलची एमआरपी 89,900 रुपये आहे. ॲमेझॉनच्या एडिशनल पेमेंट ऑफर्सद्वारे तुम्ही आयफोन 16 चया खरेदीवर आणखी बचत करू शकता. यात पात्र एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर 1,250 रुपयांपर्यंतची बँक सवलत आणि ॲमेझॉन पे बॅलन्सद्वारे 2,309 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा समावेश आहे. तसेच निवडक क्रेडिट कार्ड्स पर नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 40,300 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.
जर तुम्ही नवीन आयफोन मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयफोन 17ई तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. आयफोन 17ई चे 256GB मॉडेल सेलमध्ये 71,999 रुपयांत उपलब्ध आहे. याची एमआरपी 79,900 रुपये आहे. आयफोन 17ई खरेदी करणारे पात्र ग्राहक क्रेडिट कार्ड्सद्वारे 1,250 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट मिळवू शकतात. याशिवाय ॲमेझॉन पे बॅलेंसद्वारे 2,159 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. या सर्व ऑफर्स पात्रतेच्या अटींच्या अधीन आहेत; त्यामुळे, तुम्ही कोणत्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता हे पाहण्यासाठी प्रोडक्ट पेजवरील नियम आणि अटी नक्की तपासा. याशिवाय, ॲमेझॉनवर 2,531 रुपये प्रति महीना ईएमआय पर्याय वापरून देखील तुम्ही हे आयफोन मॉडेल खरेदी करू शकता. दरम्यान, ग्राहक त्यांचे जुने फोन एक्सचेंज करून 37,300 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकतात.