
JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी... यूजर्सना मिळणार खास फायदे
Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
उदाहरणार्थ, समजा तुम्ही 30 ऑक्टोबर रोजी रिचार्ज केला आहे, तर हा प्लॅन पुढील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी फार मोठी नाही, पण फायदेशीर आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला 30 किंवा 31 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच संपूर्ण महिनाभर रिचार्ज करण्याची चिंता नाही. आता आम्ही तुम्हाला रिलाअंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असणाऱ्या अशाच दोन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये जिओचा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणि 339 रुपयांचा प्रीपेड प्लॅन यांचा समावेश आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
रिलाअंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना 18 महिन्यांसाठी गूगल एआय प्रोचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 5,000GB (5TB) चे क्लाउड स्टोरेज ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये 5G डेटा समाविष्ट आहे. यामध्ये दररोज केवळ 1.5GB डेटा मिळणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊड ॲपचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. हा प्लॅन मंथली सर्विस व्हॅलिडिटीसह येणार आहेत.
जिओच्या 339 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 1.5GB डेली डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळणार आहे. हा प्लॅन देखील मंथली सर्विस व्हॅलिडीटीसह येणार आहेत. 319 रुपये आणि 339 रुपये या दोन्ही प्लॅनमध्ये फरक केवळ इतका आहे की, 339 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14.95 रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील गूगल एआय प्रोचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील 5G डेटा बंडल नाही. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडचा ॲक्सेस समाविष्ट आहे. हा प्लॅन ‘व्हॅल्यू’ श्रेणीमध्ये येतो.
रिलाअंस जिओचे 319 रुपये आणि 339 रुपयांचे दोन्ही प्रीपेड प्लॅन्स भारताच्या सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही मायजिओ ॲपवरून हे प्लॅन्स खरेदी करू शकता.