
iPhone 16 vs iPhone 17: कमी किंमतीत जुना मॉडेल की जास्त पैसे खर्च करून लेटेस्ट आयफोन? तुम्ही कोणाची निवड करणार?
दोन्ही आयफोन मोडेल्सची डिझाईन काही प्रमाणात सारखीच आहे. मात्र दोन्ही डिस्प्लेमध्ये फार फरक आहे. Apple ने पहिल्यांदा स्टँडर्ड iPhone मध्ये 120Hz ProMotion LTPO डिस्प्ले दिला आहे. आयफोन 17 मध्ये 6.3-इंच LTPO OLED, 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस, Always-on सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोन 16 मध्ये 6.1-इंच OLED, 60Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 मध्ये नवीन A19 चिप दिली आहे, जो CPU मध्ये सुमारे 40% आणि GPU मध्ये 80% पर्यंत जास्त वेगवान असल्याचे सांगण्यात आलं आहे. तर, iPhone 16 देखील दमदार आहे. मात्र हेवी गेमिंग, AI फीचर्स आणि लॉन्ग टर्म वापरात A19 जास्त टिकाऊ आहे. जर तुम्हाला पुढील 3 ते 4 वर्षांसाठी फोन पाहिजे असेल तर आयफोन 17 चांगला पर्याय आहे.
iPhone 17 मध्ये 48MP वाइड + 48MP अल्ट्रावाइड, नवीन 18MP सेंटर स्टेज फ्रंट कैमरा, AI बेस्ड फ्रेमिंग आणि वीडियो फीचर्स देण्यात आले आहे. तर आयफोन 16 मध्ये 48MP वाइड + 12MP अल्ट्रावाइड आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे.
iPhone 17 मध्ये मोठी बॅटरी आणि जास्त एफिशिएंट 3nm चिप आहे. ज्यामुळे यामध्ये 30 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकचा दावा केला जातो. आयफोन 16 मध्ये 22 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकचा दावा केला जातो.
आयफोन 17 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 82,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,02,900 रुपये आहे. तर आयफोन 16 च्या 128GB व्हेरिअंटची किंमत 69,900 रुपये आहे.