Diwali 2025: दिवाळीपूर्वीच iPhone 16e वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, Amazon-Flipkart नाही इथे उपलब्ध आहे Deal Diwali 2025: दिवाळीपूर्वीच iPhone 16e वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, Amazon-Flipkart नाही इथे उपलब्ध आहे Deal
सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु झाला आहे. दिवाळीत अनेक लोकं नवीन स्मार्टफोन खरेदी करतात. कारण दिवाळीत स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध असतं. त्यामुळे बचत करण्याची संधी देखील मिळते आणि नवीन स्मार्टफोन देखील खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयफोन 16e खरेदी करू शकता.
यंदाच्या दिवाळीत आयफोन 16e खरेदी करण्याचा गोल्डन चांस तुमच्याकडे आहे. आयफोन 16e च्या खरेदीवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्स अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नाही तर रिलायंस डिजिटलवर उपलब्ध आहेत. रिलायंस डिजिटलवर आयफोन 16e च्या खरेदीवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक हा आयफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. रिलायंस डिजिटलवर आयफोन 16e च्या खरेदीवर 9,900 रुपयांहून अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी बेस्ट आहे. चला तर मग आयफोन 16e वर उपलब्ध असलेल्या डिलबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक जायंट कंपनी Apple ने यावर्षीच्या सुरुवातीला iPhone 16e लाँच केला होता. हा आयफोन भारतात 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता दिवाळी सेलमध्ये या आयफोनची किंमत कमी झाली आहे. दिवाळी सुरु होण्यापूर्वीच रिलायंस डिजिटलच्या अधिकृत वेबसाईटवर iPhone 16e च्या खरदेवीर 9,910 रुपयांचे प्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे वेबसाईटवरून हा आयफोन केवळ 49,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच लाँचिंग किंमतीपेक्षा हा आयफोन 9,910 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जे लोकं यंदाच्या दिवाळीत नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हे उत्तम ऑफर आहे.
Apple iPhone 16e च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या आयफोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एक 60Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले आहे. या डिव्हाईसमध्ये एल्युमीनियम डिजाइन आणि फेस आईडी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवा. iPhone 16e मध्ये तुम्हाला Apple चा पावरफुल A18 चिपसेट देखील मिळणार आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायंच झालं तर या डिव्हाईसमध्ये 2x ऑप्टिकल झूमवाला 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूस डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे iPhone 16e मध्ये खास AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इमेज क्लीनअप टूल, इमेज प्लेग्राउंड, ChatGPT इंटीग्रेशन देखील मिळणार आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये USB-C पोर्ट आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.