Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या

iPhone 17: आयफोन 17 यावर्षींचा सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. महागाईच्या काळात देखील लोकांनी आयफोन 17 खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. यामागील कारण काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 08:52 AM
महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या

महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • आयफोन 17 ला मिळाली लोकांची सर्वाधिक पसंती
  • प्रिमियम किंमत असून देखील आयफोन 17 ठरला सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन
  • प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलच्या तुलनेत आयफोन 17 ची किंमत कमी
नवीन स्मार्टफोन खरेदी करताना आपल्या मनात येणारा सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे सध्या कोणत्या स्मार्टफोनची सर्वात जास्त क्रेझ आहे आणि कोणत्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होत आहे? कारण देशात अनेक कंपन्या आहेत ज्या सतत त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करत असतात. यामध्ये ॲप्पल, मोटोरोला, ओप्पो, वनप्लस, विवो, नथिंग यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या सगळ्यांमधून आपल्यासाठी योग्य स्मार्टफोन शोधणे एक मोठे आव्हान असते. यामुळे अनेक लोक अशाच स्मार्टफोनची खरेदी करतात ज्याची सर्वाधिक विक्री होत आहे. आता आम्ही तुम्हाला अशाच एका फोनबद्दल सांगणार आहोत, ज्याची यावर्षी सर्वाधिक विक्री केली गेली. हा फोन म्हणजेच iPhone 17.

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

आयफोन 17 ठरला सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन

स्मार्टफोन खरेदी करताना बजेटला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. मात्र काही वेळेस आपल्या गरजा आणि आपले छंद बजेटवर मात करतात आणि आपण आपला ड्रीम फोन खरेदी करतो. आयफोन 17 च्या बाबतीत देखील असेच काही घडले. या आयफोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये आहे. मात्र तरी देखील लोकांनी या आयफोनला आपली पसंती दर्शवली. या फोनमध्ये असं काय खास आहे, ज्यामुळे याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest) 

सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनच्या यादीत आयफोन 17 ने मारली बाजी

यावर्षी भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनच्या यादीत ॲपलच्या आयफोन 17 ने बाजी मारली आहे. याची किंमत 82,900 रुपयांपासून सुरु होते. प्रिमियम किंमत असून देखील या आयफोन मॉडेलला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. या फोनने 4 टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा नोंदवला आहे. विशेष म्हणजेच, या प्रिमियम आयफोनसोबत यादीमध्ये असलेल्या इतर फोन्सची किंमत बजेट फ्रेंडली रेंजमध्ये होती. ओप्पो ए6 एक्स 5G आणि विवोच्या मॉडेल्सने देखील या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. मात्र आयफोन 17 ने सर्वांना मागे टाकले.

आयफोन 16 ची क्रेझ देखील अद्याप कायम

केवळ आयफोन 17 च नाही तर आयफोन 16 ची क्रेझ देखील अद्याप कायम आहे. हे मॉडेल जुने असले तरी देखील त्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. यावरून असे समजते की, काही लोकं नव्या मॉडेलची निवड करतात. तर काहीजण त्यांच्या बजेटनुसार जुने मॉडेल खरेदी करतात.

आयफोन 17 ला का मिळाली ग्राहकांची पसंती?

आयफोन 17 हा एक प्रिमियम रेंज स्मार्टफोन 82,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. किंमतीवरून स्पष्टपणे समजते की हा एक प्रिमियम स्मार्टफोन आहे. मात्र तरी देखील या आयफोनने विक्रीच्या बाबतीत सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकले आहे. यामागील सर्वात पहिले आणि मुख्य कारण म्हणजेच हा सिरीजमधील लेटेस्ट आणि स्वस्त आयफोन आहे. तसेच ईएमआय आणि एक्सचेंजचा वापर करून हा आयफोन खरेदी केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय, बँक कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना जास्तीचे डिस्काऊंट देखील ऑफर केले जाऊ शकते. या सिरीजमधील प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलच्या किंमती अधिक जास्त आहेत.

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

आयफोन 17 खरेदी करण्याचे दुसरे कारण म्हणजेच जर तुमच्याकडे मॅक, ॲपल वॉच किंवा एअरपॉड असेल तर तुम्ही या डिव्हाईसला आयफोन अगदी सहज कनेक्ट करू शकता. कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अपडेटमुळे देखील लोकं आयफोन 17 खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. ज्या यूजर्सना नवीन कॅमेरा, स्मूद स्क्रीन आणि ॲपल डिव्हाईससह आयफोनचा वापर करायचा असेल त्यांच्यासाठी आयफोन 17 एक चांगला पर्याय ठरणार आहे.

Web Title: Iphone 17 became the most selling smartphone this year what are reasons read in details hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • iphone 17

संबंधित बातम्या

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
2

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.