
Apple चाहत्यांनो तयार राहा! 2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार 'हे' खास फीचर्स
असं सांगितलं जात आहे की, कंपनीने नुकताच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला होता. या आयफोन लाँचिंगनंतर कंपनीने त्यांचे पुढील शेड्यूल पूर्णपणे बदलले आहे. अशा माहिती आहे की, 2027 मध्ये कंपनी केवळ सप्टेंबर महिन्यातच नाही तर फेब्रुवारी ते एप्रिल 2027 दरम्यान देखील लाँच ईव्हेंट आयोजित करू शकते. या ईव्हेंटची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहिर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी यावेळी आयफोन 18 मध्ये 6.3 इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देऊ शकते, जो 1.5K रेजोल्यूशन आणि 120Hz प्रोमोशन रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. हा आगामी आयफोन अधिक पातळ बेजल्स आणि जास्त ब्राईट स्क्रीन ऑफर करण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर या डिव्हाईसमध्ये A20 चिपसेट देखील दिला जाऊ शकतो, जो TSMC ची 2nm टेक्नोलॉजीवर आधारित असणार आहे. यासोबतच, 9GB किंवा 12GB रॅम आणि 256GB ते 512GB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कंपनी त्यांच्या आगामी आयफोनमध्ये 4,430mAh बॅटरी देऊ शकते. तर फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये 48MP चे दोन रिअर कॅमेरे आणि 18MP किंवा 24MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 ई बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. डिव्हाईसमध्ये A20 प्रोसेसर, C2 मॉडेम आणि 8GB किंवा 9GB रॅम मिळू शकते. या डिव्हाईसमध्ये 4,430mAh बॅटरी, 6.1 इंच ओएलईडी डिस्प्ले आणि 60Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. या आगमी आयफोनमध्ये 48MP चा रिअर आणि 24MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
यावेळी कंपनी आयफोन एअर 2 मध्ये 48MP चे ड्यूअल कॅमेरे देणार आहे. या डिव्हाईसमध्ये मोठी बॅटरी, छोटा डायनॅमिक आयलंड आणि ए20 प्रो चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले, टाइटेनियम बॉडी, 12GB रॅम आणि 18MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, आयफोन 18 ची सुरुवातीची किंमत सुमारे 1 लाख रुपये असू शकते. आयफोन 18 ई ची किंमत 80 हजार रुपये असू शकते. तर आयफोन एअर 20 ची किंमत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये असू शकते.
Ans: समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Apple 2027 मध्ये आयफोन 18, आयफोन 18e आणि आयफोन Air 2 हे तीन नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.
Ans: रिपोर्ट्सनुसार, आयफोन 18 फेब्रुवारी ते एप्रिल 2027 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.
Ans: आयफोन 18 मध्ये 6.3 इंच LTPO OLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz ProMotion रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.