iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री
Apple iPhone 17 Pro Series Launched in India: Apple च्या नवीन आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेल्स भारतात लाँच करण्यात आले आहे. कंपनीने मंगळवारी ‘Awe Dropping’ ईव्हेंट आयोजित केला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने Apple iPhone 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधीस प्रिमियम मॉडेल्स म्हणजेच iPhone 17 Pro आणि 17 Pro Max देखील काल भारतात लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये A19 Pro चिप देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या हे दोन्ही प्रो मॉडेल्स iOS 26 वर आधारित आहे. कंपनीच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना कंपनीचे सिईओ टिम कूक यांनी प्री-रिकॉर्डेड ईव्हेंटची घोषणा केली, जो Apple ची वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलवर लाइवस्ट्रीम करण्यात आला होता. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या डिव्हाईसमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिव्हाईस अॅपल इंटेलिजेंस सूटच्या सर्व आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) फीचर्सना सपोर्ट करतात. (फोटो सौजन्य – X)
iPhone 17 Pro ची किंमत US मध्ये 256GB व्हेरिअंटसाठी 1,099 डॉलर आणि iPhone 17 Pro Max ची किंमत 256GB व्हेरिअंटसाठी 1,199 डॉलर आहे. भारतात iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंंमत 1,34,900 रुपये आणि 17 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हे मॉडेल्स कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्वर कलर ऑप्शंसमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. iPhone 17 Pro मॉडल्स 12 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहेत आणि 19 सप्टेंबरपासून ग्लोबली त्यांची विक्री सुरु होणार आहे.
iPhone 17 Pro मॉडेल्स पुन्हा एकदा एल्युमिनियम बिल्डसह लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच या नवीन आयफोन मॉडेलमध्ये iPhone 15 Pro आणि iPhone 16 Pro प्रमाणे टाइटेनियम बॉडी देण्यात आली नाही. तर दुसऱ्या बाजूला, लाइनअपच्या नवीन मेंबर iPhone 17 Air ला टाइटेनियम बॉडी देण्यात आली आहे. Apple ने यावेळी यूनिबॉडी डिजाइन दिले आहे, ज्यामध्ये मागील बाजूस ‘फुल-विथ कॅमेरा प्लेटो’ देण्यात आला आहे, ज्यामुळे डिझाईनला एक नवं रुप मिळतं.
iPhone 17 Pro कंपनीचा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये वेपर चेंम्बर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, डिमांडिंग वर्कलोड्सदरम्यान अधिक चांगला परफॉर्मेंस देण्यासाछी हा आयफोन डिझाईन करण्यात आला आहे. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये ProMotion 120Hz पर्यंत सपोर्ट आहे. तर 17 Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्पेसिफिकेशन्स प्रो मॉडेलप्रमाणेच आहेत. सिरेमिक शील्ड 2, ज्यामध्ये Apple चे नवीन डिझाईन करण्यात आलेले कोटिंग आहे, स्क्रीनला 3 पट जास्त स्क्रॅच प्रतिरोधक बनवते. दोन्ही डिव्हाईसची पीक आउटडोर ब्राइटनेस 3,000 निट्स आहे.
iPhone 17 Pro मॉडल्समध्ये नवीन A19 Pro चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला कंपनीच्या नवीन वेपर चेंम्बरसह जोडण्यात आलं आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांची ‘सर्वात शक्तिशाली’ आयफोन चिप मागील पिढ्यांपेक्षा 40 टक्के चांगली शाश्वत कामगिरी देते. यात सहा-कोर सीपीयू आणि सहा-कोर जीपीयू आर्किटेक्चर आहे, ज्यामध्ये प्रत्येक जीपीयू कोरमध्ये न्यूरल एक्सीलरेटर एम्बेड केलेले आहेत.
आयफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर iPhone 17 Pro मॉडलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेंसर आणि 48-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस आहे. आयफोनच्या मागील बाजूस असलेल्या तिन्ही कॅमेऱ्यांचे रिझोल्यूशन 48-मेगापिक्सेल इतकेच असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील जनरेशनच्या तुलनेत 12-मेगापिक्सेलच्या तुलनेत टेलीफोटो कॅमेऱ्यामध्ये सर्वात मोठं अपग्रेड देण्यात आले आहे. Apple चं म्हणणं आहे की, हे 56 टक्के मोठा आहे आणि 8x ऑप्टिकल जूम आणि 40x डिजिटल जूम ऑफर करते. फ्रंटला 18-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जो फोटोज को डायनॅमिकली फ्रेम करण्यासाठी सेंट्रल स्टेजचा वापर करतो.
iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max आउट-ऑफ-द-बॉक्स iOS 26 वर आधारित आहेत. हे नवीन ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोनमध्ये लिक्विड ग्लास यूजर इंटरफेससह नवीन Apple इंटेलिजेंस फीचर देखील देण्यात आले आहेत. यूजर्स मेसेज, फेसटाइम आणि फोन अॅपमध्ये लाइव ट्रांसलेशन, अपग्रेडेड विजुअल इंटेलिजेंस कॅपेबिलिटीज आणि कॉल आणि मेसेजसाठी नवीन स्क्रीनिंग टूल जसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) फीचरचा वापर करू शकतात.
iPhone 17 Pro मॉडल्समध्ये यूनिबॉडी डिजाइनमुळे मोठी बॅटरी देण्यात आली आहे. अॅपलने असाही दावा केला आहे की आयफोन 17 प्रो मॅक्सची बॅटरी लाईफ ‘कोणत्याही आयफोनमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम आहे’. ही उपकरणे कंपनीच्या उच्च-वॅटेज यूएसबी-सी पॉवर अॅडॉप्टरला सपोर्ट करतात आणि 20 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतात असा दावा केला जातो.