
Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज
लीक्सनुसार, कंपनी एक स्मार्ट होम हब, एक फोल्डेबल आयफोन आणि एक कमी किंमतीत उपलब्ध असणारा मॅकबुक देखील लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. MacRumors रिपोर्ट्सनुसार, 2026 अॅपल कंपनीसाठी गेमचेंजर ठरण्याची अपेक्षा आहे. यावर्षी कंपनी कोणते गॅझेट्स लाँच करणार आहे, याची यादी समोर आली आहे. तथापी कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी देखील यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17
आयफोन 18 प्रो
आयफोन 18 प्रो मॅक्स
फोल्डेबल आयफोन
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कंपनी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान काही प्रोडक्ट्स लाँच करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की, कंपनी यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत आयफोन 17e पासून नवीन मॅकबुक प्रोपर्यंत काही प्रिमियम डिव्हाईस लाँच करू शकते. जुलै ते डिसेंबर दरम्यान, कंपनी त्यांचे नवीन आयफोन, नवीन अॅपल वॉच आणि कदाचित त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन देखील सादर करू शकते.