iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत
iPhone 17: Apple मंगळवारी आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये त्यांची नवीन लाईनअप लाँच केली आहे. Apple’s ‘Awe-Dropping 2025 ईव्हेंट मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा ईव्हेंट सुरु झाला. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने त्यांच्या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची घोषणा केली आहे. या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची सुरुवात एंट्री-लेवल iPhone 17 ने झाली आहे. या सिरीजमधील बेस मॉडेल आहे.
iPhone 17 मध्ये अधिक चांगला डिस्प्ले, उत्तम फ्रंट आणि रिअर कॅमेरा आणि अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या ऑल न्यू iPhone 17 मध्ये यावेळी आधीच्या मॉडेलच्या तुलनेत 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या बेस मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ProMotion हाई-रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हे ऑलवेज-ऑन मोडला देखील सपोर्ट करते. iPhone 17 मध्ये केवळ फास्ट CPU च नाही तर GPU परफॉर्मेंस देखील अधिक चांगला करण्यात आला आहे. हे मॉडेल नवीन A19 चिपने सुसज्ज आहे. या बेस मॉडेलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तसेच याची किंमत काय आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
I am Soo Happy With iPhone 17❤️
✅ 6.3″ 120HZ LTPO OLED, AOD
✅ 48MP main + 48MP UW
✅ 18MP Square Shape Selfie to help with Vertical & Horizontal selfies
✅ 256GB base Variant
✅ Apple A19 SoC
✅ NEW Ceramic shield 2 Display
✅ 3000 nits Brightness
✅ Faster charging pic.twitter.com/DtB1BaEgTM— Techno Ruhez (@AmreliaRuhez) September 9, 2025
कंपनीने लाँच केलेल्या या एंट्री लेव्हल आयफोन 17 मध्ये देखील यावेळी डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे आणि 12MP चा टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. तथापि, यावेळी समोर 24MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो त्याच्या मागील मॉडेलपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे आता आयफोन युजर्सची फोटोग्राफी अधिक चांगली होणार आहे, यात काही शंकाच नाही.
Apple ने असं सांगितलं आहे की, गेल्या वर्षीच्या iPhone 16 मध्ये देण्यात आलेल्या A18 चिप पेक्षा आयफोन 17 मधील नवीन A19 चिप 20 टक्के फास्ट आहे. iPhone 17 मध्ये 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3,000 निट्सपर्यंत अधिक चांगल्या ब्राइटनेससह अपग्रेड करण्यात आला आहे. कंपनीने असं सांगितलं आहे की, व्हिडीओ पाहताना टाइम प्रोमोशन डिस्प्लेसह एकदा चार्ज केल्यानंतर हे डिव्हाईस 8 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम ऑफर करतो. iPhone 17 बेस मॉडेल 5 नव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये काळा, पांढरा, निळा, Sage आणि जांभळा यांचा समावेश आहे.
iPhone 17 चे बेस मॉडेल भारतात 82,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.