iPhone 17 Series Update: अखेर रहस्यावरून पडदा उठलाच! या दिवशी धमाका करणार iPhone 17 सीरीज! लाँच डेट लीक
Apple च्या आगामी सिरीजच्या लाँचिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सिरीज कधी लाँच होणार, त्यामध्ये कोणत्या डिव्हाईसचा समावेश असणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत. अॅप्पलच्या आगामी सिरीजच्या लॉचिंगबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असतानाच आता या सिरीजची लाँच डेट लीक झाली आहे. कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य शेअर केले नाही. एका जर्मन रिपोर्टनुसार आगामी अॅप्पल 17 सिरीजची लाँच डेट आणि ईव्हेंटची तारीख लीक झाली आहे. या अपडेटमुळे युजर्स प्रचंड उत्सुक आहेत.
असं सांगितलं जात आहे की, iPhone 17 सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश असणार आहे. पहिल्या दोन मॉडेलमध्ये A19 चिप आणि Pro मॉडेल्समध्ये A19 Pro चिपसेट दिला जाऊ शकतो.
जर्मन पब्लिकेशन iPhone-ticker.de नुसार, iPhone 17 सिरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. iPhone-ticker.de ने असा दावा केला आहे की, Apple यावर्षी 9 सप्टेंबर रोजी त्यांची सिरीज लाँच करू शकतो. मात्र याबाबत Apple ने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. क्यूपरटिनो बेस्ड टेक कंपनी Apple दरवर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर्मन पब्लिकेशन iPhone-ticker.de ने केलेल्या दाव्यानुसार जर iPhone 17 सिरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच झाली, तर या सिरीजची प्री -ऑर्डर बुकिंग 12 सप्टेंबरपासून सुरु केली जाऊ शकते. तर सिरीजची विक्री आणि शिपमेंट 19 सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याआधी आगाामी iPhone 17 सिरीजच्या लाँचिंगबाबत काही दावे करण्यात आले होते. यापूर्वी करण्यात आलेले दावे आणि iPhone-ticker.de ने दिलेली माहिती, यामध्ये बरंच साम्य आहे. Mark Gurman यापूर्वीच हिंट दिली आहे की, यंदाचा Apple ईव्हेंट 8 ते 12 सप्टेंबरदरम्यान लाँच केला जाऊ शकतो.
गेल्यावर्षी iPhone 16 सीरीज गेल्यावर्षी 9 सप्टेंबर रोजी ‘It’s Glowtime’ ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आली होती. तर iPhone 15 लाइनअपने 12 सप्टेंबर 2023 रोजी ‘Wonderlust’ ईव्हेंटमध्ये धमाका केला होता. iPhone 17 सिरीजसोबतच आगामी ईव्हेंटमध्ये Apple Watch चे नवीन मॉडेल्स आणि तिसऱ्या जनरेशनचे AirPods Pro देखील लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, iPhone 17 आणि iPhone 17 Air मध्ये A19 चिप असणार आहे, तर iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मध्ये अधिक पावरफुल A19 Pro चिपसेट असणार आहे. iPhone 17 आणि Pro मॉडल्समध्ये 6.3-इंच डिस्प्ले, iPhone 17 Air में 6.5-इंच स्क्रीन, आणि iPhone 17 Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. iPhone 17, 17 Air आणि 17 Pro मध्ये एलुमिनियम फ्रेम दिली जाऊ शकते. तर iPhone 17 Pro Max मध्ये प्रीमियम टाइटेनियम फ्रेम दिली जाऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 17 वगळता इतर सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये सुमारे $50 (सुमारे 4,000 रुपये) वाढ होऊ शकते.
iPhone 17 सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश असणार?
iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max
iPhone 16 सीरीजची लाँच डेट काय आहे?
9 सप्टेंबर 2024
iPhone 15 सीरीजची लाँच डेट काय आहे?
12 सप्टेंबर 2023