
iPhone 17 Series: आयफोन 17 च्या प्रो मॉडेलमध्ये होणार मोठा बदल, स्टोरेज फुल होण्याचं टेंशन संपणार! नवे फीचर्स लीक
टेक जायंट कंपनी अॅपलची आयफोन 17 सिरीज पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. या आयफोन सिरीजसाठी सर्वजण उत्सुक आहेत. या आयफोन सिरीजमध्ये 4 मॉडेल्सचा समावेश असणार आहे. यातीलच एक मॉडेल iPhone 17 pro चे डिटेल्स लिक झाले आहेत. असं सांगितलं जात आहे की, iPhone 17 pro मध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. त्यामुळे iPhone 17 pro मध्ये अनेक मोठे अपग्रेड पाहायला मिळणार आहेत. iPhone 17 च्या मॉडेल्सच्या डिझाईनमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.
केवळ iPhone 17 ची डिझाईनच बदलणार नाही तर त्याच्या स्टोरेजमध्ये देखील अनेक बदल केले जाणार आहेत. आयफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे आयफोनचे स्टोरेज. आता आयफोनची स्टोरेज कॅपेसिटी वाढवली जाणार आहे. त्यामुळे आता युजर्सना स्टोरेजची समस्या येणार नाही. एक लीक समोर आली आहे. iPhone 17 प्रोचे स्टोरेज अपग्रेड केले जाणार आहे. यूजर्सना आता फोनची मेमरी भरली जाण्याची चिंता करण्याची गरज नाही. iPhone 17 प्रो शी संबंधित एक नवीन लीक समोर आली आहे, ज्यामध्ये फोनची किंमत तसेच स्टोरेज ऑप्शनबद्दल माहिती मिळाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 Pro बाबत चीनी टिप्सटर Setsuna Digital ने माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म Weibo वर डिटेल शेयर केले आहेत. यावर्षी लाँच केला जाणाऱ्या प्रो मॉडलमध्ये 128GB वाला व्हेरिअंट लाँच केला जाणार नाही. तर अॅपल यावर्षी दोन्ही प्रो मॉडेल 256GB वाला व्हेरिअंटसह लाँच केला जाणार आहे. हे मॉडेल तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये 256GB, 512GB आणि 1TB यांचा समावेश असणार आहे. गेल्या वर्षी, iPhone 16 Pro चा 128GB व्हेरिअंट लाँच करण्यात आला होता, ज्याची किंमत 1,19,900 रुपये होती.
iPhone 17 Pro मध्ये 6.9 इंच सुपर रेटिना डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. तर या फोनमध्ये A19 Pro Bionic प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा फोन 256GB/512GB/1TB या तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. फोनमध्ये 50MP + 48MP + 50MP आणि फ्रंटला 12MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर फोनमध्ये iOS 26 आणि एप्पल इंटेलिजेंसचा देखील समावेश असणार आहे.
iPhone 17 Pro चा बेस 256GB वाल्या मॉडेलची किंमत गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोनच्या तुलनेत 50 डॉलर म्हणजेच सुमारे 4,400 रुपये जास्त असणार आहे. त्यामुळे iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंंमत 1,24,900 रुपये असण्याची शक्यता आहे. iPhone 17 Plus ऐवजी iPhone 17 Air लाँच केला जाऊ शकतो, ज्याची किंमत 1 लाख रुपयांच्या रेंजमध्ये असणार आहे.
iPhone 17 Pro मध्ये नवीन स्क्रॅच रेसिस्टेंट आणि एंटी रिफ्लेक्टिव डिस्प्ले कोटिंग सिस्टम देखील दिला जाणार आहे. iPhone 17 Pro च्या प्रो मॉडलमध्ये 48MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय, ते 8x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. याशिवाय, या वर्षी लाँच होणाऱ्या आयफोन 17 सिरीजमध्ये ChatGPT-5 सपोर्ट उपलब्ध असेल. ही आयफोन सिरीज iOS 26 सह लाँच केली जाईल, ज्याला Apple Intelligence चा सपोर्ट मिळेल.