Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे करोडो युजर्स आहेत. या युजर्सच्या फायद्यासाठी कंपनी नेहमीच नवीन आणि फायदेशीर प्लॅन्स घेऊन येत असते. कंपनीने आतापर्यंत युजर्ससाठी अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सना अनेक सुविधा आणि फायदे दिले जातात. असे देखील काही प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये युजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे जिओ युजर्स नेहमीच आंनदी असतात. याच जिओ युजर्ससाठी आता एक वाईट बातमी आहे.
जिओ कंपनीने युजर्समध्ये लोकप्रिय असलेला 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅन खूप प्रसिद्ध आहे. ज्यांना 1 महिन्याची व्हॅलिडीटी आणि कमी डेटा पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर होता. मात्र आता कंपनीने हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅन बंद करण्याचे कारण अद्याप कंपनीने सांगितलं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या 249 रुपयांच्या बजेट फ्रेंडली प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची होती. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात होती. याशिवाय या बजेट फ्रेंडली प्लॅनमध्ये फ्री जियो सिनेमा सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जात होते. मात्र हाच बजेट फ्रेंडली प्लॅन आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सना मोठा झटका लागला आहे.
जिओने अचानक त्यांचा बजेट फ्रेंडली प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने युजर्सना मोठा झटका लागला आहे. कंपनीने हा प्लॅन का बंद केला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, कंपनीने त्यांचा नफा वाढवण्यासाठी हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. परवडणाऱ्या पॅकच्या शोधात असलेल्या अनेक यूजर्सना आता नवीन पर्यायांकडे वळावे लागेल.
जिओच्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमधील सर्वात मोठी खासियत म्हणजेच कमी किंमतीत जास्त फायदे. हा एक बजेट फ्रेंडली प्लॅन होता, ज्यामध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस या सुविधा ऑफर केल्या जात होत्या. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची होती. या प्लॅनमध्ये युजर्सना 100 एसएमएस आणि जिओ टीव्ही सोबत, जिओ क्लाउड सारख्या सेवांचा मोफत प्रवेश देखील उपलब्ध होता, ज्यामुळे हा प्लॅन आणखी खास बनला.
जर तुम्ही अजूनही तुमच्या बजेटमध्ये रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर जिओचा 239 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला थोडा जास्त डेटा मिळतो म्हणजेच दररोज 1.5GB डेटा, त्यासोबत अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाते, परंतु त्याची व्हॅलिडीटी फक्त 22 दिवसांची आहे, जी काही यूजर्ससाठी थोडी कमी असू शकते.