iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या आगामी आयफोन सिरीजमध्ये कोणत्या मॉडेल्सचा समावेश असणार, याबाबत देखील माहिती समोर आली आहे. तसेच आगामी आयफोन सिरीजचे अपेक्षित फीचर्स आणि अपेक्षित किंंमत देखील समोर आली आहे. पुढील महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आयफोन 17 सिरीजच्या ईव्हेंटसाठी सर्वजण उत्सुक आहेत.
आयफोन 17 सिरीज लाँच ईव्हेंटपूर्वी एक अपडेट समोर आली आहे. आयफोन 17 मॉडेलचे भारतात प्रोडक्शन सुरु झाले आहे.
रिपोर्ट्सनुसार, कर्नाटक स्थित फॉक्सकॉन संंयंत्रमध्ये आयफोन 17 मॉडेलचे प्रोडक्शन केले जात आहे. यासोबतच कंपनी चेन्नई स्थित यूनिटमध्ये देखील या मॉडेलचे प्रोडक्शन करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक जायंट कंपनी अॅपल हळूहळू भारतात त्यांचे प्रोडक्शन वाढवण्यावर भर देत आहे. 2024-25 मध्ये कंपनीने भारतात आयफोनच्या सुमारे 4 करोड यूनिट्सचे प्रोडक्शन केले होते. हे प्रोडक्शन यावर्षी वाढवले जाण्याची शक्यता आहे. यावर्षी कंपनी आयफोनच्या 6 कोटी यूनिट्सचे प्रोडक्शन करण्याची शक्यता आहे. भारतात फॉक्सकॉन आयफोनचे प्रोडक्शन करते. कंपनीला 2023 मध्ये यासाठी परवानगी देण्यात आली आहे आणि या स्थापनेसाठी कंपनीने 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, आयफोन 17 चे उत्पादन भारतासोबतच चीनमध्येही केले जात आहे.
पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये आयफोन 17 सिरीज लाँच केली जाऊ शकते. या आयफोन 17 सिरीजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 एयर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स मॉडेल यांचा समावेश असणार आहे. लीक्सवर विश्वास ठेवला तर असं सांगितलं जात आहे की, या सीरीजमध्ये 256GB बेस स्टोरेज ठेवला जाऊ शकतो. याशिवाय, या मॉडेल्सचे वजन कमी ठेवण्यासाठी, त्यांना टायटॅनियमऐवजी अॅल्युमिनियम बॉडीमध्ये लाँच कले जाणार आहे. या सिरीजमधील मागील डिझाइन अपडेट केले जात आहे आणि नवीन फुल-विड्थ कॅमेरा आयलंड डिझाइन दिला जाईल.’
आयफोन 17 सिरीजची सुरुवातीची किंमत 83,300 रुपये असण्याची शक्यता आहे. तर या सिरीजमधील प्रो व्हेरिअंटची किंमत आयफोन 16 सीरीजच्या प्रो मॉडेलपेक्षा जास्त असू शकते.
आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत किती असू शकते?
83,300 रुपये
आयफोन 17 सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स असणार आहेत?
आयफोन 17, आयफोन 17 एयर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स