Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
भारतातील लोकप्रिय टेक ब्रँड लावा भारतात एक नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन Lava Play Ultra 5G या नावाने लाँच केला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, हा एक बजेट सेंट्रिक गेमिंग फोन असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी असणार आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही. मात्र या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.
कंपनीने या आगामी स्मार्टफोनचा टिझर देखील शेअर केला आहे. टिझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा स्मार्टफोन 5G सपोर्ट असणार आहे आणि यामध्ये 64-मेगापिक्सेल AI मॅट्रिक्स कॅमेरा दिला जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफेकशन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आगामी स्मार्टफोनबाबत माहिती देण्यात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, हा स्मार्टफोन बुधवार 20 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. लाँच झाल्यानंतर, तुम्ही हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनद्वारे खरेदी करू शकाल. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने लाँच होण्यापूर्वी लावा प्ले अल्ट्रा 5G ची मायक्रोसाइट देखील लाईव्ह केली आहे.
मात्र या पेजवर अद्याप आगामी स्मार्टफोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला नाही. पण ही मायक्रोसाइट येणाऱ्या हँडसेटच्या गेमिंग पॉवरची झलक देते, कंपनीने लिहिले आहे की “मोबाइल गेमिंग परफॉर्मन्सचा एक नवीन युग आता सुरू होणार आहे.”
स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच काही फीचर्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार Lava Play Ultra 5G मध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. ज्यासोबतच या फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील दिला जाणार आहे. Lava Play Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7300 चिपसेट आणि UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो. डिव्हाईसचा AnTuTu बेंचमार्क स्कोर 7 लाखांहून अधिक आहे आणि हा एक डेडिकेटेड गेमबूस्ट मोडद्वारे अधिक चांगला गेमिंग परफॉर्मंस देण्याचा दावा करतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Lava Play Ultra 5G एक उत्तम कॅमेरा ऑफर करू शकतो. तुम्हाला मागे 64-मेगापिक्सेल एआय मॅट्रिक्स कॅमेरा मिळू शकतो. तसेच, डिव्हाइसमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि नॉइज कॅन्सलेशनसाठी ड्युअल मायक्रोफोन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.