
2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
सरकारने गेल्या वर्षी नवरात्रीपूर्वी GST च्या किंमती कमी करून इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट स्वस्त केले होते. मात्र यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट आणि स्मार्टफोन कंपन्यां त्यांच्या किंमती आधीपेक्षा जास्त वाढवू शकतात. त्यामुळे स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न तुटणार आहे. स्मार्टफोनच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर स्मार्टफोन चीपच्या तुटवड्यामुळे फोनच्या किंमती सुमारे 6.9% पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर 10,000 रुपयांच्या स्मार्टफोनची किंमत सुमारे 10,700 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काउंटरप्वाइंट रिपोर्टनुसार, स्मार्टफोनची एवरेज सेलिंग प्राइस (ASP) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे क्रिटिकल कंपोनेंट्स जसे रॅम आणि मेमोरी कार्ड यांच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या किंमतींचा यूजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अलीकडेच सॅमसंगने चिपच्या कमतरतेमुळे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काढून टाकले आहे. याच प्रकरणावरून तुम्ही देखील चिपच्या कमतरतेचा अंदाज लावू शकता. स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना रॅम, चिपसेट आणि इतर कंपोनेंटसाठी बराच काळ वाट पाहावी लागत आहे. एआयच्या वाढत्या मागणीमुळे चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या डेटा सेंटरसाठी चिप तयार करत आहेत. याचा परिणाम सामान्य चिप्सच्या उत्पादनावर होत आहे. मेमरी कार्डचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांना स्टॉकची कमतरता भासू शकते. परिणामी स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होणार आहे.
अनेक रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगितलं आहे की, 2026 मध्ये चिपव्यतिरिक्त इतर कंपोनेंट्सच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची एंड प्राईज देखील वाढू शकतो. अनेक ब्रँड्सनी त्यांच्या बजेट स्मार्टफोन्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. विशेषत: शाओमी, ओप्पो आणि ऑनर सारख्या चीनी कंपन्या मिड आणि प्रीमियम फोनवर फोकस करत आहेत. कमी नफ्यामुळे कंपन्यांना तोटा होत होता.
Ans: साधारण 2 ते 4 वर्षे, वापरावर अवलंबून.
Ans: Android कस्टमायझेशनसाठी, iPhone सिक्युरिटी आणि परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो.
Ans: सामान्य वापरासाठी 6GB, जड वापरासाठी 8GB किंवा जास्त.