
iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
खरं तर चार्जिंगदरम्यान दोन्ही आयफोनच्या स्पीकरमधून एक वेगळा आवाज येत आहे. याबाबत अॅपल सपोर्ट कम्युनिटीसह अनेक प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चा सुरू आहे. इथे अनेक युजर्स यांच्या अनुभव शेअर करत आहे. युजर्सच असं म्हणणं आहे की त्यांचा आयफोन चार्जिंगला लावताच जुन्या रेडिओसारखा स्टेटिक आवाज आयफोनमधून येत आहे. अनेक युजर्स या समस्येचा सामना करत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
युजरने सांगितले आहे की, चार्जिंग व्यतिरिक्त आयफोनवर ऑडिओ चालू करताच आणि आवाज कमी करताना देखील वेगळाच गोंधळ पाहायला मिळतो. अनेक यूजर्सचे असे देखील म्हणणे आहे की, जेव्हा फोनमध्ये कोणताही ऑडिओ चालू नसतो तेव्हा देखील फोनमधून एक वेगळाच आवाज येत असतो. तर काही युजर्सने अशी देखील तक्रार केली आहे की जेव्हा फोन चार्जिंगला नसतो तेव्हा देखील यामधून थोडा थोडा आवाज येत असतो. केबलने चार्जिंग न करता आयफोन मॅग्सेफ चार्जर चार्ज केला तरी देखील आवाजाची समस्या बंद होत नाही.
अॅपल कम्युनिटी फोरमवर ऑक्टोबरच्या एका पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अॅपल या समस्येबाबत माहिती देत आहे. त्यावेळी, कंपनीच्या एका सीनियर सपोर्ट इंजीनियरने यूजर्सना फुल हार्डवेयर डायग्नोस्टिक रन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता यूजर्सचं म्हणणं आहे की, या उपायाने देखील त्यांची समस्या सुटली नाही. याशिवाय सीनियर सपोर्ट इंजीनियरने यूजर्सना पुढील अपडेटची वाट पाहण्याचा किंवा आयफोन रिप्लेस करण्याचा सल्ला दिला. अॅपलने ऑक्टोबरमध्ये iOS 26.2 लाँच केले, परंतु त्यांनी या समस्येचे निराकरण केले नाही. आता, या महिन्याच्या शेवटी, कंपनी iOS 26.3 लाँच करत आहे, जे यूजर्सना या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकते. तुम्ही देखील आयफोन यूजर असाल आणि तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर कंपनीच्या नवीन अपडेटची तुम्हाला देखील वाट बघावी लागणार आहे.
Ans: काही युजर्सनुसार चार्जिंगदरम्यान हलका आवाज येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत, मात्र Apple कडून यावर अधिकृत प्रतिक्रिया नाही.
Ans: आयफोन यूजर्सना चार्जिंग दरम्यान आवाजाची समस्या येत आहे.
Ans: