iPhone 17 Vs iPhone 16: हे 5 मोठे बदल आणि लोकं बनले नव्या आयफोन सिरीजचे दीवाने! जाणून घ्या सविस्तर
Apple ने 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या आयफोनमधील कॅमेरा, बॅटरी, डिस्प्ले आणि परफॉर्मेंसमध्ये अनेक बदल केले आहेत. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 पेक्षा आयफोन 17 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या नव्या सिरीजमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्सचा समावेश केला आहे. आयफोन 16 पेक्षा आयफोन 17 मध्ये अनेक अपग्रेड दिले आहेत. पण या दोन्ही आयफोनमध्ये नेमका काय फरक आहे, तुम्हाला माहिती आहे का? कंपनीने जुन्या मॉडेलपेक्षा या नव्या सिरीजमध्ये कोणते बदल केले आहेत, जाणून घेऊया.
iPhone यूजर्सच्या मनातील सामान्य प्रश्न म्हणजे जुना मॉडेल वापरावा की नवीन मॉडेलवर स्विच करावं. यावेळी, आयफोन 17 मध्ये इतके अपग्रेड केले गेले आहेत की आयफोन 16 किंवा त्याहून जुने मॉडेल वापरणारे लोक नक्कीच नवीन फोन घेण्याचा विचार करतील. हे बदल कोणते आहेत आणि लोकं आयफोन 17 ला इतकी का पसंती देत आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 मध्ये 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर iPhone 16 मध्ये 6.1 इंच स्क्रीन आहे. नवीन मॉडेल आता 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट ऑफर करते, जो ऑलवेज-ऑन मोडमध्ये 1Hz पर्यंत कमी होतो. iPhone 17 ची पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत आहे. iPhone 16 मध्ये आउटडोर वापरासाठी 2000 निट्स आणि HDR कंटेंटसाठी 1600 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या मजबूतीसाठी यामध्ये Ceramic Shield 2 देण्यात आला आहे, जो आधीपेक्षा 3 पट जास्त स्क्रॅच-रेजिस्टेंट आहे.
iPhone 17 मध्ये A19 चिपसेट देण्यात आला आबे, जो 3nm TSMC प्रोसेसरवर आधारित आहे. यामध्ये 6-कोर CPU आणि 5-कोर GPU आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे A18 चिप (iPhone 16) पेक्षा सुमारे 20% वेगवान आहे.
नवीन मॉडेल 48MP मेन सेंसर आणि 48MP अल्ट्रावाइड लेंसने सुसज्ज आहे. यामध्ये चांगल्या मॅक्रो फोटो आणि 2x ऑप्टिकल टेलीफोटो सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोनच्या फ्रंट कॅमेराला देखील अपग्रेड करण्यात आला आहे. नव्या आयफोनमध्ये 24MP कॅमेरा देण्यात आला आहे, जो वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये सेल्फी क्लिक करण्याची सुविधा देतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये Center Stage फीचर देण्यात आले आहे.
iPhone 17 च्या बॅटरी लाईफबद्दल, कंपनीचा दावा आहे की तो iPhone 16 पेक्षा 8 तास जास्त टिकेल. स्टोरेजच्या बाबतीत, iPhone 17 चा बेस व्हेरिएंट 256GB पासून सुरू होतो. याचा अर्थ असा की यावेळी 128GB व्हर्जन उपलब्ध होणार नाही.
अमेरिकेतील मार्केटमध्ये iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 256GB स्टोरेजसाठी $799 ठेवण्यात आली आहे. भारतात या मॉडेलची किंमत 82,990 रुपये ठेवण्यात आली आहे. iPhone 16 ची किंमत 69,900 रुपये आहे.