हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश
iPhone त्याच्या किंमतीमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्सच्या किंमती नेहमीच लाखोंच्या घरात असतात. जेव्हा नवीन आयफोन सिरीज लाँच होते, तेव्हा जुन्या आयफोनच्या किंमती कमी होतात. अँड्रॉईड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोन खूप महाग आहेत. आयफोनच्या किंमती ऐकल्या की आपल्या मनात एकच प्रश्न येतो. हा प्रश्न म्हणजे आयफोनच्या किंमती इतक्या जास्त का? आयफोनमध्ये असं काय खास आहे, ज्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. याचं उत्तर आहे, आयफोनमध्ये वापरले जाणारे पार्ट्स. आयफोनमधील महागडे पार्ट्स आणि त्यांची प्रिमियम क्वालिटी याच कारणामुळे आयफोनची किंमत इतकी जास्त असते. मात्र आयफोनमधील सर्वात महागडा पार्ट कोणता, तुम्हाला माहिती आहे का?
आयफोनमधील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा पार्ट म्हणजे त्याचा डिस्प्ले. Apple त्यांच्या iPhone मध्ये OLED किंवा Super Retina XDR डिस्प्लेचा वापर करते. हा डिस्प्ले Samsung आणि LG सारख्या मोठ्या कंपन्या तयार करतात. हा डिस्प्ले अत्यंत हाई-टेक असतो आणि यामध्ये HDR सपोर्ट, हाय ब्राइटनेस, चांगली कलर एक्यूरेसी आणि स्मूथ टच रिस्पॉन्स सारखे फीचर्स दिलेले असतात. अहवालानुसार, iPhone च्या केवळ डिस्प्लेची किंमत 150 ते 200 डॉलर म्हणजेच सुमारे 12 से 16 हजार रुपयांपर्यंत असते. बाकी स्मार्टफोनच्या तुलनेत ही किंमत खूप जास्त आहे. जर आयफोनचा डिस्प्ले तुटला किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर त्याच्या दुरुस्तीचा खर्च देखील प्रचंड असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनमधील डिस्प्लेची किंमत सर्वात जास्त असते, हे खरं असलं तरी आयफोनमध्ये इतर अनेक पार्ट्स असतात, ज्यांचा वापर केल्यामुळे आयफोनची किंमत वाढते. Apple ने स्वत: डिझाईन केलेले A-सीरीज बायोनिक चिप प्रचंड पावरफुल आणि एनर्जी-एफिशिएंट असते. हे चिप तयार करणं आणि डेव्हलप करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. याशिवाय iPhone चा मल्टी-कॅमेरा सेटअप अॅडवांस सेंसर, OIS, आणि AI-बेस्ड प्रोसेसिंगसह येतो. याची निर्मिती आणि इंटीग्रेशन करण्यसाठी देखील मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
iPhone मध्ये वापरले जाणारे हाई-स्पीड NAND फ्लॅश स्टोरेज देखील खूप महाग असतात. iPhone मध्ये वापरली जाणारी बॅटरी आणि प्रीमियम बॉडी मटेरियल (जसे की सर्जिकल-ग्रेड स्टेनलेस स्टील आणि सिरेमिक शील्ड) देखील त्याची किंमत वाढवतात. एकूणच आयफोन तयार करण्याचा खर्च खूप आहे.
आयफोनची किंमत केवळ हार्डवेअरवर नाही तर सॉफ्टवेअरवर देखील आधारित असते. Apple चे iOS ऑपरेटिंग सिस्टम, सिक्योरिटी फीचर्स, दिर्घकाळ मिळणारे अपडेट्स आणि अॅप्सचे ऑप्टिमाइजेशन यामुळे हे डिव्हाईस प्रिमियम रेंजमध्ये लाँच केले जाते. आयफोनचा सर्वात महागडा भाग म्हणजे त्याचा डिस्प्ले, परंतु प्रोसेसर, कॅमेरा आणि स्टोरेजसारखे इतर भाग देखील त्याच्या किमतीत लक्षणीय भर घालतात.