
Apple 20th Anniversary: Apple चा मास्टरस्ट्रोक! iPhone 18 नंतर थेट लाँच होणार 20 सिरीज? हे असू शकतं कारण
जगभरातील लोकप्रिय स्मार्टफोन आयफोनबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या आयफोन 17 सिरीज लाँच केली. बऱ्याच वर्षानंतर आयफोन सिरीजच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले होते. 2026 मध्ये कंपनीची आयफोन 18 सिरीज लाँच केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. या सिरिजमध्ये फोल्डेबल आयफोन लाँच केला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
आता असा दावा केला जात आहे की, आयफोन 18 लाँच झाल्यानंतर कंपनी थेट आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे. म्हणजेच आयफोन 19 ची सिरीज स्किप केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मागील कारण काय आहे, कंपनीने असा निर्णय का घेतला आहे याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
2026 मध्ये Apple ची आयफोन 18 सिरीज लाँच केली जाणार आहे. त्यानंतर 2027 मध्ये Apple कंपनीला 20 वर्षे पूर्ण होणार आहे आणि याच निमित्ताने कंपनी आयफोन 19 सिरीज स्कीप करून थेट आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे. आयफोन 20 सिरीजला खास बनवण्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी सुरू केली आहे. हा इव्हेंट अतिशय स्पेशल असणार आहे, कारण यावेळी आयफोनबनवणारी कंपनी म्हणजेच टेक जायंट Apple ला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच निमित्ताने कंपनी आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे.
Apple सीरिजमध्ये पहिल्यांदाच फुल डिस्प्ले ऑफर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 20 प्रोच्या स्क्रीनवर डायनॅमिक आयलंड किंवा नोच साल्फा कट आउट दिला जाणार नाही. यावर कोणतेही बेजल्स देखील नसतील. या सिरीजमध्ये पहिल्यांदाच फुल-डिस्प्ले फोन असेल. फ्रंटला एप्पल वॉच प्रमाणे ग्लास व सिंगल पीस नजर येईल. Apple च्या अपकमिंग प्रोडक्टची माहिती देणाऱ्या एनालिस्ट Heo Moo-yeol यांचं म्हणणं आहे की, Apple चे हे पाऊल 2017 मध्ये त्यांनी घेतलेल्या धोरणाची आठवण करून देते, जेव्हा त्यांनी त्यांच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त iPhone X लाँच केला होता.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा Apple एखादी सिरीज स्किप करत आहे. 2017 मध्ये iphone ने 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयफोन 9 सिरीज लाँच केली नव्हती. कंपनीने आयफोन 8 नंतर 9 सिरीज करून थेट आयफोन 10 सिरीज लॉन्च केली होती. कंपनीने त्यांची हीच परंपरा आणि हा ट्रेंड सुरू ठेवला आहे. आता कंपनी आयफोन 19 सिरीज स्किप करून थेट आयफोन 20 सिरीज लाँच करणार आहे. याबाबत अद्याप कंपनीचे कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत आहे.
2027 मध्ये लॉन्च केली जाणारी आयफोन 20 सिरीजचे लाँच ईव्हेंट Apple च्या नेहमीच्या लाँच शेड्युलपेक्षा थोडे वेगळे असू शकतो. ही सिरीज सप्टेंबर ऐवजी फर्स्ट हाफमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. आयफोन 5 नंतर Apple सर्व सिरीज सप्टेंबर मध्ये लॉन्च करत आहे.